ओलांडुन जाताना.. भाग-1
सूर्य मावळतिला आला होता.. तिची अस्वस्थता शिगेला पोहोचली होती.. ही त्यांची अखेरची भेट ठरणार होती का एक नविन सुरुवात? याचं उत्तर आजची संध्याकाळ देणार होती.. काल रात्री पासून हा प्रश्न तिल सतावत होता.. कालची 31 डिसेम्बरची रात्र.. ती न्यू इयर पार्टी अणि त्या पार्टीत तिने त्याच्या हातात ठेवलेलं ते पत्र.. बाराचे ठोके पडत होते आणि त्याला मीठी मारून Happy New Year wish करून सिंड्रेल्ला सारखी पार्टी मधून पळतच ती निघाली होती.. उत्तराची वाट न बघता.. तेव्हापासूनच ही अस्वस्थता तिच्या मनात घर करून राहिली होती.. खरं तर त्या दोघांची भेट झाली तेव्हा पासूनच ही अस्वस्थता तिच्यात घर करू लागली होतीच.. कारण ती पाहताच त्याच्या प्रेमात पडली होती.. त्या घटनेला वर्ष उलटलं आता.. ते या सोसायटीत rent वर जागा घेवुन रहायला आले होते.. ती, तिचे आई बाबा आणि मोठा भाऊ.. त्यांच कुटुंब तसं अप्पर मिडल क्लास मधे गणता येइल असं.. वडिल बँकेत कामाला.. तिन वर्षांपूर्वी त्यांची मुंबईत बदली झालेली आणि तेव्हा पासूनच त्यांचा हा विंचवाच्या बिर्हाडाचा प्रवास सुरु झाला.. दर वर्षी जागा घ्यायचं प्लानिंग पण कुठे न कुठे माशी शिंकणा...