ओलांडून जाताना... भाग-१२
आभा प्रचंड खूष होती.. काल प्रतीकला असिस्ट करायची जवाबदारी
तिने स्वीकारल्यानंतर ती खूप नवनवीन गोष्टी अनुभवत होती.. प्रतीकने तिला एकांकिकेच
स्क्रिप्ट वाचायला दिलं.. तिला बऱ्याच गोष्टी समजावल्या.. सगळे गेल्यावरही ते दोघं
बराच वेळ ऑडीमधे बसून होते.. काही मुलं मुली बदलल्या होत्या.. त्यांच रीडिंग आभाला
करून घ्यायचं होतं.. जवाबदारी फार मोठी नव्हती.. पण आभाला याचा आनंद होता कि
तिच्यावर कुणीतरी विश्वासाने जवाबदारी टाकली होती..
ती घरी जायला म्हणून खाली उतरली तेव्हा आकाश ग्रुपमधल्या
काही लोकांबरोबर तिथेच थांबला होता.. आभाला पाहिल्यावर त्याचा चेहरा खुलला..
“कॉंगरॅटस आभा.. मला खरच खूप आनंद होतोय कि तुला.. तू
असिस्ट करतेयस आमच्या एकांकिकेला..”
“Thanks आकाश..”
हे आकाशमुळेच झालं होतं.. प्रतिक आभावरून त्याला बरच काही
बोलला होता जे आभाला सहन झालं नव्हतं.. त्यावरून ती प्रतिकला बरंच काही बोलली होती
आणि तिच्या धीटपणावर खुश होवूनच प्रतिकने तिला हि ऑफर देवू केली होती.. (भाग ११)
आभाला खरं तर आकाशचे आभार मानायचे होते.. पण ती म्हणाली..
“हे सगळं काही प्रतिक सरांमुळे झालय.. हि फेल्ट कि मी हे
करू शकेन.. नाहीतर मला काय येतय ह्यातलं.. सो ऑल क्रेडीट गोज टू प्रतिक सर..”
“ए.. सर काय म्हणतेस.. एकदम मास्तर असल्यासारखं वाटतं..”
सगळ्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर तिथे प्रतिक उभा
होता..
“सर नाही.. नुसतं प्रतिकच म्हण यार.. सिनिअर असलो तरी अजून
या कॉलेजमधे शिकतोय मी.. इतकंही आउट डेटेड करू नका..”
यावर सगळेच हसले.. आभाही हसली..
“चला आणि.. सगळे इथे काय करताय.. कुठल्या प्रोफेसरनी पाहिलं
ना तुम्हाला असं इथे टाईमपास करताना तर मला झापतील.. एकांकिकेच्या एक्सक्युज देवून
पोरांना टाईमपास करायला सोडून देतो म्हणून.. चला घरी..”
सगळे ‘आम्ही आता निघणारच होतो’ वगैरे बोलून तिथून निघायला लागली..
आभाही निघाली तसा आकाशही पाठोपाठ निघाला.. इतक्यात प्रतिकने हाक मारली..
“आभा..” आभाने वळून पाहिलं.. तसा आकाशही वळला.. “तू कशी
जाणार आहेस?”
आकाश आपण तिला सोडणार आहोत असं बोलायला जाणार तोच आभा
म्हणाली..
“ट्रेनने जाईन.. आता ५ नंबरवरून डायरेक्ट बोरीवली फास्ट
मिळेल मला..”
हे ऐकून आकाशच्या चेहऱ्यावरच हसूच मावळल..
“चल मग.. आपल्या एकांकिकेचा कंपोजर राहतो ओशिवरा म्हाडाला..
मी त्याच्याकडे जातोय.. सोडतो तुला.. तू गोरेगावला राहतेस ना..”
“हो.. तिथेच जवळच..”
“चल मग.. आधीच उशीर झालय मला.. लेट्स गो..”
आभाने आकाशकडे पाहिलं.. तिला हे माहिती होतं कि आकाश
तिच्यासाठीच थांबला होता.. आणि आभालाही त्याच्यासोबतच जायचं होतं.. पण विधीशाची
सूचना होती.. तिने सांगेपर्यंत आकाशची लिफ्ट स्वीकारायची नाही.. आकाश तिच्याकडे
पाहून कसंनुस हसला.. त्याच्या त्या हसण्यात त्याचं हिरमुसलेपण इतकं दिसत होतं कि आभाला
सगळाच चुकीचं वाटू लागलं.. का ऐकायला हवं विधीशाच.. काय गरज आहे या प्लानची.. का
आत्ताच्या आत्ता आपण आकाश सोबत बाईकवर जावू शकत नाही.. त्याला घट्ट मिठी मारून.. जगाची
अजिबात पर्वा न करता..
“आभा येतेयस ना..”
प्रतीकच्या हाकेने आभा भानावर आली.. तिला अजूनही काय करावं
कळत नव्हतं.. तिने इथे तिथे पाहिलं आणि रस्त्याच्या पलीकडे तिला अदिती दिसली.. ती
टॅक्सी पकडत होती.. आभाला पटकन काहीतरी सुचलं..
“आकाश.. अदिती..” तिने खुणावून आकाशला दाखवल.. आकाशने मागे
वळून पाहिलं.. अदिती रस्त्याच्या कडेला उभी राहून येणाऱ्या जाणार्या टॅक्सीना हात
दाखवत होती.. दरवेळी रीहर्सल संपल्यावर तो अदितीला घरी सोडायचा.. पण त्यांच्यात हा
सगळा गोंधळ झाल्यानंतरची हि पाहिलीच रिहर्सल होती..
“आकाश तिला लिफ्ट दे.. ते जास्त महत्वाचं आहे..” आभाचं
वाक्य आकाशच्या कानावर पडलं आणि आकाशने पुन्हा वळून आभाकडे पाहिलं.. पण ती तोपर्यंत
वळून प्रतीकच्या गाडीच्या दिशेने चालत निघाली होती.. ती गाडीचं दार उघडून
शेजारच्या सीटवर बसली.. आणि प्रतीकने गाडी कॉलेजच्या गेटबाहेर काढली..
आभाने हा सारा प्रकार सहज केलेला असला तरी तिच्यासाठी हे
सार जड होतं.. आकाश वळायच्या आत मुद्दामच ती तिथून निघाली होती.. कारण जर त्याच्या
डोळ्यात तिने पाहिलं असत तर विधीशाच्या प्लान प्रमाणे पुढे ती काहीच करू शकली
नसती.. ती गाडीत बसली तेव्हाही थरथरत होती.. प्रतीकने ते बरोबर हेरलं..
“आकाश.. बॉयफ्रेंड आहे तुझा?”
आभाने त्याच्याकडे पाहिलं.. पण ती काहीच बोलू शकली नाही..
फक्त हसली.. खरच काय सांगणार होती ती.. याचं नक्की उत्तर तिच्याकडेही नव्हतं..
अदिती अजूनही टॅक्सी पकडण्याचा प्रयत्न करत होती.. पण एकही टॅक्सी
तिच्यासाठी थांबत नव्हती.. आणि जरी थांबली तरीही तिच्या घरी यायला मागत नव्हती...
त्यांच्या कॉलेजपासून तिच्या घराकडे तशाही टॅक्सीज यायला तयार व्हायच्याच नाहीत..
अदिती आता वैतागली होती.. सोहम त्याच्या क्लास मधे बिझी होता.. आणि आज त्याच्या
भरवशावर राहून तिने घरून गाडीही बोलावली नव्हती.. अदितीला काय करावं कळत नव्हतं
इतक्यात आकाशची बाईक त्याच्या शेजारी येवून उभी राहिली..
“बस.. मी सोडतो..”
अदितीने त्याच्याकडे पाहिलं.. हि घटना तशी नेहमीचीच होती..
रिहर्सल नंतर आकाशने तिला बाईकवर सोडणं.. पण घटना तिचं असली तरी आज परिस्थिती
बदलली होती..
“Thanks आकाश.. पण जाईन मी..”
“अदिती.. जे झालं ते विसरून आपण मूव्ह ऑन नाही का करू शकत?”
“मी तोच प्रयत्न करतेय आकाश..” तिच्या तोंडून हे वाक्य
आकाशला जरा वेगळंच वाटत होतं.. आणि तिचं असं वागणंहि.. जर तिला आकाशबद्दल कधीच
काही वाटलं नव्हतं तर ती अशी का वागत होती हा प्रश्न आकाशला पडला होता..
खरं तर आकाशला आजकाल काहीच कळेनासं झालं होतं.. आभा आत्ता
त्याच्यासोबत अशी का वागली होती.. आता अदिती असं का वागत होती.. या मुलींना समजून
घेणं हे अतिशय कठीण आहे.. यांची मनं वाचता आली असती तर किती बरं झालं असतं असं
आकाशला वाटत होतं.. त्याचवेळी अदितीला टॅक्सी मिळाली आणि ती त्याला बायही न करता टॅक्सीत
बसून निघून गेली.. आकाशला या सगळ्याने कन्फ्युज झाला होता..
आभा त्याच्यावर अजूनही प्रेम करते का?.. आणि जर करते तर ती
अशी का वागतेय?
अदितीला त्याच्याबद्दल खरच काही वाटतंय का? जर वाटत होतं तर
तिने सोहमला का होकार दिला होता?
आकाशला साऱ्याच घटना विचित्र वाटत होत्या.. पण अजून एक अशीच
घटना दुसऱ्याच दिवशी त्याच्या आयुष्यात घडली.. अगदी अनपेक्षित..
दुसऱ्या दिवशीची रिहर्सल सुरु होती.. आभा नवीन मुलांकडून
डायलॉग्ज वाचून घेत होती.. आकाश तिच्याकडेच बघत बसला होता.. त्यांची डान्सची
प्रक्टिस सुरु झाली नव्हती.. डान्ससाठी सगळेच थांबले होते.. कारण अदिती अजून यायची
होती.. इतक्यात अदितीला बघायला गेलेला एक मुलगा ऑडीमधे आला.. त्याच्या चेहऱ्याचा
रंगच उडाला होता..
“अदिती एकांकिकेचा प्रयोग करू शकणार नाही म्हणतेय..”
सगळ्यांसाठीच हा आश्चर्याचा धक्का होता.. आकाशच्या मनात
शंकेची पाल चुकचुकली.. त्याच्यामुळे तर ती नाही म्हणत नसेल ना.. पण एव्हाना प्रतिकमधला
जमदग्नी जागा झाला होता..
“काय फालतूगिरी आहे हि.. हे काय नवीन नाटक तिचं?”
त्याचा चढलेला आवाज ऐकून बातमी घेवून आलेला मुलगा घाबरला..
तोच काम करायला नाही म्हणतोय अशा आवेशात प्रतिक त्याच्याकडे आला..
“तिला माहित नाही का.. कि तिची जागा कुणी घेवू शकत नाही..
इतक्या शॉर्ट नोटीसवर तर नाहीच नाही.. कुठेय ती?”
“ओल्ड बिल्डींगच्या कॅन्टीनमधे..” तो मुलगा घाबरतच म्हणाला..
तसा प्रतिक रागाने ऑडीबाहेर निघाला.. इतक्यात आभाने त्याला थांबवलं..
“प्रतिक..” प्रतिक रागातच तिच्या दिशेने वळला..
“आता तुझं काय?”
“अं.. मी जाते..” आभा धीर करत म्हणाली..
“का?.. तू काय आई आहेस तिची.. तुझं लगेच ऐकणार आहे का ती..”
“पण काही गोष्टी ती तुला कदाचित नाही सांगू शकणार..”
प्रतिक समजून घ्यायचा मन:स्थितीत नव्हता.. तो मोठमोठ्याने
आभालाच सुनावू लागला..
“का.. मी काय सुर घेवून जातोय तिला विचारायला.. माझी
एकांकिका ती स्पॉइल करतेय.. तिचं काही कारण असेलं तरी मला कळायलाच पाहिजे..
श्रीमंतांच्या बिनडोक मुलींची नाटकं खपवून घ्यायला बसलो नाहीये मी इथे..”
“प्रतिक..” आभाने त्याच्याही वर आवाज चढवला.. तसे सगळेच शॉक
झाले.. प्रतीकही या अचानक हल्याने गप्प झाला.. आभा शांतपणे चालत त्याच्याकडे आली..
आणि तितक्याच शांतपणे त्याला म्हणाली.. “मी तिला परत आणेन.. मला जावू दे..” प्रतिक
दोन क्षण काहीच बोलला नाही.. आभाच्या आवाजात प्रचंड कॉन्फिडन्स होता.. आपण तिलाच
पाठवणं योग्य आहे असं त्याला वाटलं.. तो न बोलता दारातून बाजूला झाला.. आभा
कुणाकडेही न पाहता दारातून बाहेर पडली..
आभा इतक्या आत्मविश्वासाने बोलली होती पण तिलाही आपण करतोय
ते योग्य आहे कि नाही याची काहीच कल्पना नव्हती.. विधीशाने पुढची पायरी म्हणून
काही गोष्टी करायला तिला सांगितल्या होत्या पण अदितीने हा नकार का दिलाय हे माहित
नसताना त्या प्लानला धरून हे पाउल उचलणं मूर्खपणाचं होतं.. आभाने तो मूर्खपणा केला
होता.. आता परिणाम काय होणार आहेत हेच तिला पहायचं होतं..
ऑडीमधे आभा गेल्यानंतर सगळेच एकप्रकारे अस्वस्थ झाले होते..
पण आकाश आणि प्रतिक सगळ्यात जास्त डिस्टर्ब होते..
प्रतीकचं हे कॉलेजचा विद्यार्थी म्हणून शेवटच वर्ष होतं.. पुढच्या
वर्षी तो बाहेरून येवून एकांकिका बसवू शकला असता.. पण त्याला याच डबक्यात रमायचं
नव्हतं.. त्याची स्वप्न मोठी होती.. त्याला यावेळी सवाई मारून आपला ठसा सगळ्यांवर
उमटवायचा होता.. दाखवून द्यायचं होतं कि तो समुद्रात उडी घ्यायला तयार आहे..
आकाशला हे कळत नव्हतं कि आभा अदितीला जावून असं काय सांगणार
आहे.. अदिती आणि आभाची ओळख होवून धड आठवडाही झाला नव्हता.. आकाशकडून तिला कळली होती
तितकीच माहिती आदितीबद्दल आभाकडे होती.. त्या माहितीच्या जोरावर आभा अदितीला
कन्विन्स करू शकेल असं आकाशला अजिबात वाटत नव्हतं.. आणि जर त्याला शंका होती त्या
प्रमाणे अदितीच्या एकांकिका सोडून जाण्याचं कारण जर आकाश असेल तर ती गोष्ट अजूनच
कठीण होवून बसणार होती.. कारण अदितीचा स्वभाव पाहता, अशा परिस्थितीत ती आकाशच्या
गर्लफ्रेंडशी बोलायला तयार होणारच नाही याची त्याला पूर्ण खात्री होती.. पण ज्या
कॉन्फिडन्सने आभा गेलिए अशात तिचा हिरमोड झालेला आकाशला पहावला नसता..
वेळ पुढे सरकत होती.. आकाश आणि प्रतीकच टेन्शन सेकंद
काट्यासोबत वरवर चढत होतं.. आभाला जावून एक तास झाला आणि प्रतीकने डिक्लेअर केलं..
“नेमकं काय झालय ते बघायला मी जातोय..”
“मी पण येवू सोबत?” प्रतिकने वळून पाहिलं.. हे बोलणारा आकाश
होता.. काल संध्याकाळच्या प्रसंगानंतर आभा आणि आकाशच काहीतरी कनेक्शन असावं याची
शंका त्याला आली होती.. त्याने दोन क्षण विचार केला आणि म्हणाला.. “चल..”
पण ते दोघं दाराबाहेर पडणार तोच आभा दारातून आत आली.. ती
एकटीच होती.. सगळ्याचे चेहरे पडले.. अदितीचा हट्टी स्वभाव सगळेच ओळखून होते..
“काय झालं.. नाही म्हणाली ती? का? काही कारण सांगितलं का
तिने?” प्रतीकने तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला..
“ती नीट बोलली ना तुझ्याशी?” आकाशच्या या प्रश्नाचा रोख
कुणालाच कळला नाही.. आभा सोडून.. त्या प्रश्नातली काळजी आणि त्या मागचं कारण तिने
ओळखलं होतं.. आणि इतका वेळ गंभीर असलेल्या आभाला हसू आलं.. तिने वळून मागे
पाहिलं..
दारातून अदिती आत आली.. कुणालाच काय रिअॅक्ट व्हावं कळेना..
सगळे आश्चर्याने बघतच राहिले.. प्रतिकने आभाकडे बघितलं..
“किती ड्रामेबाज आहेस गं तू.. खऱ्या आयुष्यात असं वागत नाही
ग कुणी.. नौटंकी कुठल्या..” आणि तो हसला.. आभाही त्याच्याकडे पाहून हसली.. अदिती
प्रतीकजवळ येवून त्याची माफी मागू लागली.. इतर सगळे रिहर्सल सुरु होणार म्हणून
तयारीला लागले.. आकाश आभा जवळ आला.. त्याला या साऱ्याचं सगळ्यात जास्त आश्चर्य
वाटत होतं..
“काय सांगितलस तू तिला.. कसं कन्विन्स केलस..”
आभा छानसं हसून म्हणाली.. “काही खास नाही.. तिचं महत्व तिला
पटवून दिलं.. बस..”
आकाशला माहिती होतं कि आभा त्याला वरवरच उत्तर देतेय आणि ते
खरही होतं.. आभा आकाशला हे कशी सांगणार होती कि तिने अदितीला सांगितलंय कि
आभा आकाशची गर्लफ्रेंड नाहीये आणि हे जे सगळं चाललंय ते एक
नाटक आहे..
क्रमशः
Comments
Post a Comment