ओलांडून जाताना... भाग - 2
आभाला सकाळी जाग आली तीच डोके दुखी मुळे.. काय झालय ते दोन मिनिटं तिल कळलच नाही.. मग एक एक करत तिला सारं काही आठवलं.. कॉलेजच्या गच्चीवर सुधाने आकाशतर्फे दिलेली चिठ्ठी.. त्यात आकाशने लिहून कळवलेला नकार.. डोळ्यातील अश्रु थोपवत आभाने धरलेली घरची वाट.. आणि न जेवता खाता स्वतःला बेडवर झोकू न देणं.. आणि उशिरा पर्यंत आसवं गाळत तसच बेडवर पडून राहणं..
तिच्या घरात सगळयांना तिची काळजी वाटत होती.. आई बाबा दादा सगळे तिला काय झालय ते खोदून खोदून विचारत होते.. ती फक्त इतकचं म्हणत होती "तब्येत बरी नाही.." हा कसला तोंड दाबुन बुक्क्यांचा मार.. जी गोष्ट तिल सगळ्यांना ओरडून सांगायची होती तीच तिला अजिबात व्यक्त करता येत नव्हती.. तिला आईच्या कुशीत शिरून रडायचं होतं.. बाबांना सारं काहि सांगायचं होतं.. त्यांनी दिलेला धीर तिला हवा होता.. दादाने दिलेले सल्ले आज तिला खरच ऐकायचे होते.. पण ती कुणालाच काही सांगू शकत नव्हती.. त्यांनी तिला समजुन घेतलं नसतं तर?? तिच्या एक दोन मैत्रीणिना हाच अनुभव आला होता.. दादाचं affair होतं.. घरात माहितीही होतं पण तिच्या affairला घरच्यांनी इतक्या सहज स्वीकारलं असतं?
ती उठुन ब्रश करायला बाथरूमकडे निघाली.. इच्छा नव्हती तरीही.. जाता जाता आरशात तिचं सहज लक्ष गेलं आणि ती थांबली.. स्वतःलाच आरशात पाहू लागली.. एका रात्रीने तिल किती बदलून टाकलं होतं.. तशी ती दिसायला चांगली होती.. गोरा रंग.. गोल चेहरा.. अपरं नाक.. काळेभोर डोळे.. लांबसडक केस.. रेखीव देह.. उठावदार उंची.. देवाने तिला सुंदर दिसण्यासाठी गरजेच्या असलेल्या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या.. पण आता आरशात दिसणारं प्रतिबिंब या वर्णनाशी विसंगत वाटेल असाच होतं.. रडून सुजलेले डोळे.. गालावर ऒघळलेले आय लायनरचे डाग.. विस्कटलेले केस.. बाप रे!! एक गोष्ट माणसाला इतकं बदलू शकते?? काही व्यक्ति आयुष्यात इतक्या महत्वाच्या कशाकाय होउन बसतात??
इच्छा नसतानाही तिने स्वतःला सावरलं आणि ती तयार होउन बाहेर आली.. आईची किचन मधे लगबग सुरु होती.. नेह्मीप्रमाणे या वेळी घरात बाकी कुणीच नव्हतं.. बाबा बँकेत तर दादा कॉलेजला गेला होता.. आईही तयार झालेली दिसत होती.. ही कुठे बाहर जाणार आहे का?? आईने तिच्याकडे पाहीलं.. आईच्या चेहर्यावरुन तिच्या मानात काय चाललय याचा पत्ता लागत नव्हता.. "उठलिस?? मला वाटलं आज मूडच नाही की काय उठायचा?? घे कॉफ़ी घे लवकर.." आईने दिलेला कॉफ़ीचा मग तिने हातात घेतला.. खरं तर कॉफ़ी तिला आवडायचीच नाही कधी.. तीचा चहाच लाडका.. पण त्याच्या सोबत कॉफ़ीशॉप मधे गेलं की त्याच्या कपातली कॉफ़ी शेअर करता यावी म्हणुन तिने कॉफ़ीची सवय लावून घेतली.. त्याच्या सोबत कॉफ़ीचा तो प्रत्येक घोट एक वेगळाच तजेला देऊन जायचा..
ती एक टक त्या कॉफ़ी मग कड़े पाहत राहिली.. शुन्यात हरवल्या सारखी.. आईनेच तिला भानावर आणलं.. "काय गं कसला विचार करतेयस? पी पटापट.."
"आई मला नकोय"
"का गं? बरोबर बनली नाहीये का?"
"नाही ते...."
"उपाशी पोटी जात नसेल.. काल रात्री पासून काही खाल्लेलं नाहीयेस.. थांब खायला देते काहीतरी.. पोह्याचा चिवडा केलाय परवा..."
तिला माहिती होतं.. तिनेच आईला बनवायला सांगितला होता.. आकाशसाठी.. त्याला पोह्याचा चिवडा खूप आवडायचा.. खासकरून तिच्या आईने बनवलेला.. दोघे एकत्र असताना बर्याच वेळा ती त्याला तो भारवायाची.. तेव्हा त्याच्या डोळ्यातले भाव बघून तिला नेहमी वाटायचं हा आत्ता विचारेल... त्याच्या डोळ्यात भरुन राहिलेलं प्रेम तिला दिसायचं.. ते नेमकं काय होतं?? ते खरच त्याच्या नजरेत होतं का तिच्या मनचा खेळ???
"आई मला नकोय काही खायला?"
आईने आश्चर्याने तिच्याकडे बघीतलं..
"का गं? काय झालं?"
"नाही काही नाही.. भूक नाहीये.."
"काल रात्रीपासून पाहतेय मी? काय बिनसलय? मला वाटत होतं नेहमीप्रमाणे मूड स्विंग्स आहेत.. पण हे तसं नाहीये.. आभा काही सिरियस नाहीये ना?"
आभाला सगळ काही सांगायच होतं..
"काही नाही आई.. खरच काही नाही.."
पण ती इतकच म्हणाली..
"जाऊ दे मी cancel च करते बाहेर जाणं.. तुझ्या बरोबर थांबण मला जास्त महत्वाचं वाटतय.."
आईची वाढलेली अस्वस्थता तिच्या बोलण्यातुन दिसत होती..
"आई dont worry.. तू जा.. मी खरच ok आहे अगदी.."
"मला मुर्ख बनवू नकोस.. ओके म्हणे.. आई आहे मी तुझी.. सगळ कळतं मला.. मुलाची काही भानगड नाही न आभा.. तसं असेल तर सांग.. मी नाही रागवणार बेटा.. प्लीज सांग.."
आईचे डोळे भरुन आले होते.. किती प्रेम करतात ही माणसं आपल्यावर.. आपला परिवार.. आपल्याला हे किती ऒळखतात.. आई पुढे बराच वेळ तिच्याशी बोलत होती.. प्रत्येक प्रसंगात ते कसे तिच्या पाठीशी आहेत हे सांगत होती.. आभा फक्त ऐकत होती.. आपल्या अशा वागण्याने आपल्यापेक्षा जास्त त्रास यांनाच होतोय हे तिला जाणवत होतं.. आपल्यावर प्रेम नसलेल्या मुलासाठी आपल्यावर इतकं प्रेम करणार्यांना त्रास द्यायचा?? का??
अखेर आईला convince करुन तिने ती जिथे जायला निघाली होती तिथे पाठवलं.. पण मानत निर्धार पक्का केला.. आकाशसाठी असं झुरायचं नाही.. गोष्ट खूप कठिण होती पण हे करण तिला भाग होतं.. तिच्यासाठी नाही तर तिच्या घरच्यांसाठीही.. हा निर्धार मनाशी पक्का करायला तिला बराच वेळ लागला.. तिलाही कळलं नाही यात किती वेळ गेला.. दार वाजलं तेव्हा ती भानावर आली.. दादा आला असणार.. मनाशी विचार करून ती दार उघडायला गेली..
तिने दार उघडलं आणि आश्चर्याने ती समोर पाहताच राहिले.. तिला कळतच नव्हतं ती जे पाहतेय ते खरं आहे की नाही.. ते हसरे डोळे.. तो प्रसन्न चेहरा.. आणि चेहर्यावरचं ते निखळ हसू.. दारात आकाश उभा होता.. तिच्याकडे पाहत.. हसतमुखाने..
क्रमश:
Comments
Post a Comment