ओलांडून जाताना... भाग - ४



खिडकीला लावलेला orange पडदा शांतच होता.. वारा खूप पडला होता बहुतेक.. रुममध्ये लावलेली विंड चाइमहि गप्पच होती.. दुपारचं ऊन बाहेर जोरावर होतं.. तरीही जानेवारीत जाणवणारा गारवा जराजरासा स्वतःच्या अस्तित्वाची चाहूल देऊन जात होता.. पण तो भासच असावा..
आभा अस्वस्थपणे आपल्या रूम मध्ये बसली होती.. आयुष्यातल्या पहिल्या प्रेमासाठी ती खूप उचापत्या करून आकाशच्या कॉलेजला admissin घेते.. ३१ डिसेम्बरचा मुहूर्त साधून त्याला प्रपोज करते.. एक तारखेला तो तिला एका पत्राद्वारे नकार कळवतो.. आणि दोन तारखेला तोच आकाश स्वतः तिच्या दारात उभा असतो.. जिला त्याने नकार दिलाय त्याच आभाला तो कुठल्यातरी अदिती नावाच्या मुलीसमोर आपली Girlfriend मानतो.. आभाला आपल्या भावनांसोबातच नाही तर आपल्या आयुष्यासोबत खेळ चाललाय याची आभाला आता खात्री वाटू लागली होती..
आपल्या मनातलं सारं काही सांगून आकाश निघून गेला होता.. “तू मला विचार करून सांगशील ना? please!” निघताना तो इतकंच म्हणाला होता.. पण कितीही विचार केला तरी आभा काय सांगणार होती.. तिच्या मनात फक्त राग भरून राहिला होता.. राग.. हाताच्या मुठीत बेडवरची चादर तिने कधीची धरून ठेवली होती.. २ वर्षांपूर्वीच सुटलेल्या नखं खाण्याच्या सवयीने तिच्या नकळत डोकं वर काढलं होतं.. किती ती अस्वस्थता.. इतक्यात आभाचा फोन वाजला आणि ती दचकलीच.. आपण नखं खातोय हे जाणवून तिलाच शरमल्यासारखं झालं.. ‘आकाश effect.. दुसरं काय!!’
इच्छा नसताना तिने फोन पहिला.. displayवर एक ठळक नाव झळकत होतं.. ‘SOULMATE’.. एका गोर्यापान बर्यापैकी हट्ट्याकट्ट्या मुलीचा फोटोही स्क्रीनवर झळकत होता.. बारीक बारीक चिनीमकाव डोळ्यांवर nerdy चष्मा, हातात ice-cream आणि निओन ग्रीन कलरचा hair band.. ती आपली समग्र बत्तीशी दाखवत प्रसन्न चेहऱ्याने फोटोतूनच आभाकडे पाहत होती.. फोन उचलू कि नको याचा आभाने दोन क्षण विचार केला.. पण हीच ती व्यक्ती होती जिच्याशी बोलल्यावर आभाला बर वाटणार होतं.. आभाने फोन उचलला आणि पलीकडून एक तार स्वरातला पण तरीही कानांना ऐकायला बरा वाटेल असा आवाज आभाच्या कानावर पडला..
“हे बेबी.. how are you?? wish you a very happy new year.. missed you sooo much throughout my trip.. How was your new Year.. आपल्या प्लान प्रमाणे झालं का सगळं? आकाश हो म्हणाला ना?”
आभाला काय बोलावं तेच कळेना.. तिला आकाशबद्दल जे वाटत होतं ते फक्त याच एका मुलीला माहित होतं.. विधिशा.. तिची बेस्ट फ्रेंड आणि चुलत बहिण.. त्यांनी मिळूनच हा चीट्ठीचा प्लान आखला होता.. विधिशा आभाच्या कॉलेजला नव्हती.. आकाशला तिने पाहिलंहि नव्हतं.. पण आभाच्या बोलण्यातून ती सगळ्यांना ओळखू लागली होती.. या ३१ डिसेंबरला विधीशानेही त्या पार्टीत असावं अशी आभाची खूप इच्छा होती.. पण विधीशाला familyसोबत मलेशियाला तिच्या मामाकडे जावं लागलं होतं.. आत्ता ती परत आली होती आणि पहिला फोन तिने आभाला केला होता.. तिच्या प्रश्नावर बराचवेळ आभाचं काहीच उत्तर आलं नाही यावरून तिने काहीतरी गडबड आहे ते ओळखलं..
“बेबी.. सगळं ओके आहे ना.. आकाश नाही म्हणाला का?”
आभाला आता राहवलं नाही.. तिला रडू फुटलंच..
“त्याच्यापेक्षा वाईट झालाय विधू..”
विधिशा panic होणार्यातली नव्हती.. तिने एक खोल श्वास घेतला आणि आभाला शांतपणे म्हणाली..
“मी गाडी पाठवतेय.. इथे निघून ये..”

विधिशा खरं तर आभाच्या वडिलांच्या चुलत भावाची मुलगी.. आभाचे आणि तिचे वडील लहानपणापासून चांगले मित्र म्हणून त्यांचे परिवार दूरदूर राहूनही touch मधे होते.. आभा आणि विधीशाची मैत्री त्यातूनच खुलत गेली.. आभा दोन वर्षांपूर्वी मुम्बईत राहिला आली आणि ती अधिकच घट्ट झाली.. मनाला येईल तेव्हा आभा तिच्याकडे आणि ती आभाकडे असं चालायचं.. विधीशाच घर वर्सोव्याला होतं.. घर कसलं.. दोन मजली बंगलाच.. समुद्राच्या जवळ.. छोटेखानी.. पिढीजात.. आभाला तो खूप आवडायचा.. त्यातही विधीशाची रूम जास्तच आवडायची.. तिथून समुद्र दिसायचा म्हणून.. आभा तासान तास त्या खिडकीत उभं राहून समुद्र पाहत रहायची..
आताही ती तशीच खिडकीत उभी होती.. विधीशाच्या फोन नंतर ती तासाभरातच इथे येवून पोहोचली होती.. दारातच विधीशाने तिला मारलेली मिठी खूप आश्वासक होती.. आभाला खूप बर वाटलं होतं.. काही लोक समोरच्याच्या भावनांना किती जपतात.. आणि काहींना कदरच नसते.. आभा विचार करत असतानाच दार उघडून विधिशा आत आली.. नेह्मीप्रमाणे हातात खाण्याच्या पदार्थांनी भरलेला ट्रे ज्यात तिने स्वतः बनवलेला बोर्नविटा.. ती हे सारं टेबलवर ठेवत असतानाच आभा तिच्या जवळ आली..
“हे सगळं कशाला विधी?”
“shut up! sad हो तब खाना तो बनता है ना.. खा आता गपचूप.. नाही एक मिनीट.. तू खा.. पण गपचूप नको.. खाता खाता मला सांग तो आकाश काय म्हणाला ते..”
“he said No!! नाही म्हणाला तो मला.. पण विचित्र काय आहे माहितीये.. ज्या संध्याकाळी पत्र पाठवून त्याने मला नकार दिला.. त्याच संध्याकाळी त्याने अदितीला सांगितलं कि मी त्याची गर्लफ्रेंड आहे.. आणि त्याच्या वरताण म्हणजे आज दुपारी तो माझ्या घरी येवून मला म्हणाला कि तू....”
“एक मिनीट आभा..” विधीशाने तिला मधेच थांबवलं.. “कोण अदिती.. तिचा आकाशशी काय संबंध.. मला जरा व्यवस्थित सांगशिल सगळं”
आभाला ती सारी कहाणी रिपीट करायची नव्हती.. पण विधीला सांगितल्या शिवाय तिला राहावलहि नसतं.. अखेर तिने फार आढेवेढे न घेता आकाशसोबत काय घडलं ते सांगितलं..

३१ डिसेम्बरच्या पार्टीत रात्री बाराच्या ठोक्यांबरोबरच आभाने आकाशच्या हातात एक पत्र दिलं.. त्याला मिठी मारली.. आधीही बर्याचदा तिने त्याला मिठी मारली होती.. पण या मिठीत आकाशला काहीतरी वेगळं जाणवलं.. आभा त्याच्या कानाशी ओठ नेत happy new year असं पुटपुटली.. जाण्याआधी तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं.. ती नजरही आकाशला वेगळीच वाटली.. दुसऱ्या क्षणाला आभा वळून निघून गेली होती.. त्याने हातातल्या पत्राकडे पाहिलं.. तो ते उघडून पाहणार होता.. पण इतक्यात एका मित्राने त्याला डान्स फ्लोर वर ओढलं.. नुकतंच त्यांनी नवीन वर्षात पदार्पण केलं होतं..
दुसऱ्या दिवशी आकाशला जाग आली तेव्हा बारा वाजून गेले होते.. त्याला केस कापायला जायचं होतं.. तिथे तो फेशिअल ब्लिचिंगहि करणार होता.. आज संध्याकाळच्या पार्टीत त्याला खास दिसायचं होतं.. आदितीच्या वाढदिवसाची पार्टी.. अदिती.. जिला कॉलेजमधे पहिल्यांदा पाहिल्यावरच आकाशला वेड लागलं होतं..
गोरा रंग.. कुठल्याही मॉडेलला लाजवेल असं शरीर.. डार्क ब्राऊन लांबसडक केस.. कत्थइ रंगाचे डोळे..  आकाशला नेह्मी प्रश्न पडायचा.. कुणी इतकं परफेक्ट कसं काय असू शकत.. फक्त दिसण्याच्या बाबतीतच नाही.. तर overallच त्या दोघांमध्ये खूप फरक होता.. ती सायन्सला तो आर्ट्सला.. तिचा ग्रुप हायफाय गाड्यांतून फिरणारा तर याच्याकडे बाईकही जुनी.. ती दादरसारख्या मध्यवर्ती एरियात राहणारी.. तर हा ओशिवरा-गोरेगाव.. पहिल्या वर्षातच ती कॉलेजच्या सगळ्या activities मधे भाग घेऊन.. रोज क़्विन बनून अख्या कॉलेजच्या ओळखीची झाली होती.. तर त्याला त्याचा मध्यमवर्गीय ग्रुप सोडून कुणीही ओळखत नव्हतं..
पण पुढच्या वर्षी त्याने ठरवून प्लान आखला.. कॉलेजच्या सगळ्या activities मधे तो भाग घेऊ लागला.. audition घेणाऱ्यांच्या कंपूत तीही असायची.. प्रत्येक auditionमधे त्याला रिजेक्ट होताना पहायची.. पण हा तितक्याच जोमाने पुढच्या auditionला हजर.. अदितीची नजर आकाशला ओळखू लागली होती.. ती मधेच कधीतरी फक्त हसायची.. आकाशच एवढयावर समाधान मानणार नव्हता.. त्याने प्रयत्न सुरूच ठेवले.. आणि त्याच्या मदतीला आला त्याचा डान्स.. आकाश अदितीसोबत एका डान्स performance साठी निवडला गेला आणि तिथुन त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली..
अदिती रिझर्वड होती.. तिला आकाशच्या group बरोबर अजिबात मिक्स व्हायचं नव्हतं.. त्यामुळे त्यांच्या भेटी होत त्या ग्रुपच्या बाहेरच.. खरंतर आकाशचे दोन ग्रुप झाले होते.. एक त्याचा नेहमीचा ग्रुप तर दुसरा कॉलेजच्या डान्सिंगटीमचा ग्रुप.. आकाशनेही हुशारीने हे दोन ग्रुप कधीच मिक्स होवू दिले नाहीत..
हळूहळू आकाशच्या प्रयत्नांना यश आलं आणि आदितीच्या डोळ्यात त्याला स्वत:बद्दल प्रेम दिसू लागलं.. तिच्या काडून त्याला positive hints मिळू लागल्या.. कुणाचा उष्टा चमचा हातात न घेणारी अदिती आकाशबरोबर एकाच मग मधून कॉफी शेअर करू लागली.. मुलांपासून एक अंतर ठेऊन असणारी अदिती आकाशच्या खांदयावर हात टाकून बसू लागली.. मित्रांच्या हायफाय गाड्या सोडून ती आकाशच्या बाईकवरून travel करू लागली.. त्यात गेल्या वर्षी जे झालं नाही ते या वर्षी झालं आणि अदितीने आकाशला आपल्या बर्थडे पार्टीला बोलावलं.. आकाशचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.. त्याने ठरवलं होतं.. आज आपलं मन मोकळ करायचं.. अदितीला आज प्रपोज करायचंच..
निघण्या आधी कपडयांची तयारी करताना त्याला जीन्सच्या खिशात काहीतरी सापडलं.. ते आभाचं पत्र होतं.. आकाशने ते उघडून पाहिलं.. आणि त्याला शॉकच बसला..

डियर आकाश..
पहिल्यांदा तुला पहिल्यापासून असं विचित्र विचित्र घडतंय..
नजर नजरेला भिडली तरी ह्रदय का धडधडतय..
स्पर्शाने तुझ्या संगीत कसं ऐकू येतं सांग ना..
माझ्याकडे कधीतरी काहीतरी माग ना..
असं तुला सांगावसं का वाटतय वेड्यासारख..
बहुतेक हेच प्रेम असावं romantic सिनेमासारखं..

I Love You आकाश..
तुझीच.. आणि फक्त तुझीच.. आभा..

आकाशसाठी हे अनपेक्षित होतं.. आभा आपल्याबद्दल असा विचार करते?? त्याला यावर विश्वासच बसत नव्हता.. त्याने घडयाळ पाहिलं.. आत्ता आभा कॉलेजच्या गच्चीवर त्याची वाट पाहत असणार होती.. पण आकाशला अदितीच्या पार्टीलाही पोहोचायचं होतं.. आभा इमोशनल होती.. तिलाही उत्तर न देवून टांगणीला ठेवणं त्याला बरोबर वाटत नव्हतं.. यावर एकाच उपाय होता.. त्याने पेन आणि पेपर घेतला आणि तो नकारच पत्र लिहू लागला..

आभा बोलता बोलता थांबली.. तिचे डोळे भरून आले होते.. तिने आकाशच पत्र विधीशाच्या हातात दिलं.. विधिशा ते वाचू लागली.. अतिशय कोरडेपणाने लिहिलेलं नकारच पत्र..
“कशी असतात ना पोरं.. एका मगातून कॉफी पिणं, खांद्यावरती हात ठेवणं.. तू केलस तर मैत्री दिसली.. आणि तिने केलं तर प्रेम.. ” विधिशा स्वत:शीच हसली.. “ठीक है.. यहां तक तो कहानी समझ मे आ गयी.. तुला तो आवडायचा.. त्याला अदिती आवडायची.. आदितीलाही तो आवडायचा.. आणि ज्या संध्याकाळी त्याने तुला नकार दिला.. त्याच संध्याकाळी तो अदितीला प्रपोज करायला जाणार होता.. बरोबर..”
विधीशाच्या Dumb प्रश्नांवर आभाने फक्त होकारार्थी मान हलवली..
“ पण मग तिला प्रपोज करायचं सोडून त्याने अदितीला तू त्याची गर्लफ्रेंड आहेस असं सांगितलं?”
“हो.. कारण तिथे आकाशसाठी काय वाढून ठेवलय याची त्याला मुळीच कल्पना नव्हती..”

क्रमशः


Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - 3