ओलांडून जाताना.. भाग १९
मकरसंक्रांतीनंतर
थंडी तिळा तिळाने कमी होते असं म्हणतात.. पण मकरसंक्रांत उलटून गेली तसा मुंबईत
गारठा वाढूच लागला होता.. रात्री जरा लवकरच रस्ते सामसूम होत होते आणि सकाळी आठ –
साडेआठ पर्यंत पहाट आहे असंच वाटत होतं.. आणि रविवारच्या दिवशी तर लोकांना नऊ साडे
नऊ पर्यंत लोकांचे दरवाजे बंद असत आणि घरात सामसूम असे..
पण
त्या रविवारी सकाळी पाच वाजता आभाचा आलार्म वाजला आणि आई घाबरून जागी झाली.. आभाही
रुममध्ये जवळपास दचकूनच उठली.. कॉलेजला जायच्या दिवशीही ती पाच वाजता उठायची
नाही.. आणि आज तर रविवार होता.. आभालाही इतक्या पहाटे आपण का उठलोय हे समजायला
थोडा वेळ गेला.. तिने मोबाईल बंद केला आणि तिचा Whatsapp वाजला.. आकाशचा मेसेज
होता..
‘गुड
मॉर्निंग... पिकनिकसाठी तयार.. <3’
आज
त्यांची पिकनिक होती.. सोहमच्या फार्महाउसवर.. कर्जतला.. महिन्याच्या सुरुवातीपासून
हा कार्यक्रम ठरवला जात होता पण काहीच जुळून येत नव्हतं.. काल फायनली एकांकिकेच्या
स्पेशल शो साठी आलेल्या सोहमने प्रतिकलाच पिकनिकसाठी विचारलं आणि प्रतीकही लगेच
तयार झाला.. सगळी मुलं पिकनिकला जायचं म्हणून एक्सायटेड होती.. मुलींना मात्र
घरच्यांच टेन्शन होतं.. लास्ट मोमेंटला ठरलेला कार्यक्रम, तोही मुंबई बाहेर, तोही
दिवसभराचा.. घरचे सोडतील कि नाही याची चिंता प्रत्येक मुलीला होती.. पिकनिकच
कॅम्पेनिंग घरच्यांसमोर कसं करायचं याच्या तालमी घरी परत जातानाच प्रत्येकाने
केल्या होत्या..
अभालाही
खरोखर टेन्शन होतं आणि पिकनिक पालकांच्या गळी उतरवण्यासाठी तिचाही एक प्लान होता..
तिने घरी गेल्या गेल्या आपल्या एकांकिकेचा प्रयोग कसा यशस्वी झाला याच्या कहाण्या
घरातल्या प्रत्येकाला सुनावल्या.. हे सारं करताना कधी नव्हे ती आईची मदत करणं..
बाबा ऑफिस मधून आल्यावर त्यांना पाणी आणून देणं.. अशा सगळ्या गोष्टी सुरूच
होत्या.. पण एवढं सारं करुनही पिकनिकचा विषय निघताच आईने नकारघंटा वाजवलीच.. मग
आभाने बाबांकडे मोर्चा वळवला.. दुसरीकडे आकाशचे Whatsapp तिला येतच होते.. ‘आर यु
कमिंग..’ , ‘ प्लीझ डोंट डिच अस’ आभाला काय करावं काही कळत नव्हतं.. पण अखेर बाबा
यावर विचार करायला तयार झाले.. कोण कोण जाणार आहेत.. मुली किती आहेत याच्या चौकशा
झाल्या आणि अखेर रात्री १२ वाजता आभाला परमिशन मिळाली..
आभा
तयार होवून खाली आली तेव्हा पावणे सहा झाले होते.. प्रचंड थंडी वाजत होती.. आभाने
जाडजूड असा स्वेटर घातला होता पण थंडी काही जायचं नाव घेत नव्हती.. ती खाली आली तेव्हा
आकाश बाईक घेवून तिची वाटच पाहत होता..
“सॉरी
आकाश.. लेट झाला मला..”
“डोंट
वरी..कोणीही येणार नाही इतक्या सकाळी..”
आभा
आकाशच्या मागे बाईकवर बसली.. आणि त्याने बाईक सुरु केली.. थंडीची एक जोरदार लाट
येवून आभावर आदळावी असं झालं तिला.. तिचा स्वेटरतर बाईकच्या या स्पीडला अपुराच
होता... रस्ते रिकामे होते आणि छान धुकं पसरलं होतं.. आभा थंडीने कापू लागली..
तिने आपल्या खांद्यावर ठेवलेले हात थरथरतायत हे आकाशला जाणवलं..
“आभा..
थंडी वाजतेय?”
“काय?”
बाईकच्या स्पीडमुळे काहीच ऐकू येत नव्हतं..
“थंडी
वाजतेय का? थंडी?”
“हो
जराशी..”
आभा
म्हणाली.. आकाशने बाईक रस्त्याच्या कडेला थांबवली..
“काय
झालं? बाईक का थांबवलीस?”
“तू
माझं जॅकेट घाल..” तो जॅकेट काढत काढत म्हणाला..
“नाही
नको.. तू आजारी पडशील उगाच?”
“मी
करेन मॅनेज.. मला नाही होणार काही..”
आभाला
माहिती होतं कि आकाश पुढे बसणार त्यामुळे त्याला वाऱ्याला डायरेक्ट तोंड द्यावं
लागणार आहे...
“काही
नको आकाश.. तू पुढे आहेस तुला जॅकेटची जास्त गरज आहे..”
“अगं
मी सांगतो न तुला काही प्रॉब्लेम नाही येणार मला..”
“आकाश..
मी इथूनच परत जाईन हा.. घाल गपचूप ते जॅकेट..” आकाश यावर निरुत्तरित झाला.. आभा
खरच असं करू शकेल याची त्याला खात्री होती.. त्याने काही न बोलता जॅकेट घातलं..
आणि ते दोघं पुन्हा बाईकवर बसले.. आकाश बाईक चालवू लागला पण आता तो बाईक अतिशय
स्लो चालवत होता.. आभाला कळत होतं हे तो तिला थंडी लागू नये म्हणूनच करतोय.. तिने
घड्याळ पाहिलं.. त्यांना आधीच खूप उशीर झाला होता..
“आकाश
तू इतक्या हळू का चालावतोयस बाईक..जरा फास्ट चालव ना..”
“आयदर
तू हे जॅकेट घाल किंवा मला माझ्या पद्धतीने चालवू दे..” आकाशही आता ऐकणार नव्हता..
आभाला त्याचं हसू आलं.. तिने बाईकच्या आरशातून आकाशकडे पाहिलं.. त्यानेही
तिच्याकडे पाहिलं आणि मग नजर फिरवली.. आभाला हे सारं फारच रोमँटिक वाटत होतं..
“आकाश..
ऐक ना.. तू फास्ट चालव बाईक.. मी तुला घट्ट धरून तुझ्या मागे बसते.. म्हणजे मला
थंडी नाही लागणार.. मग तर झालं..”
आकाशला
आभाच्या डोक्यात काय सुरु आहे हे कळलं नाही जोपर्यंत तिने ते करून दाखवलं नाही..
ती बाईकवर आकाशला घट्ट बिलगून बसली.. आकाश दोन क्षण गडबडलाच असं काही होईल याची
त्याला अजिबात कल्पना नव्हती..
“आता
ओके आहे आकाश.. मला थंडी वाजत नाहीये..”
बाईकच्या
आरशात पाहत आभा म्हणाली.. आकाश तिच्याकडे पाहून छानसं हसला आणि त्याने बाईकचा वेग
वाढवला.. दोघंही काहीही बोलत नव्हते.. फक्त हा क्षण अनुभवत होते.. हा स्पर्श, हि
वेळ, हे वातावरण, हा क्षण अगदी परफेक्ट होता.. काहीच न ठरवता.. कुठलाही प्लान न
करता.. हा क्षण तिच्या आयुष्यात आपोआप आला होता.. आयुष्य सहजच बरंच काही देवून
जातं.. आपण फक्त त्यासाठी वाट बघायची असते.. दरवेळी प्लानिंग कामाला येत नाही..
आणि प्लानिंग शिवाय मिळालेल्या गोष्टी जास्त आनंद देवून जातात..
अदिती
आणि सोहम त्याच्या गाडीतून कॉलेजकडे जायला निघाले होते.. अदिती गप्पगप्पच होती..
सोहम ड्राईव्ह करता करता फोनवर बसच्या ड्रायव्हरला सूचना देत होता.. त्याने फोन कट
केला आणि अदितीकडे पाहिलं..
“बस
पोहोचेलच १५ मिनिटात.. आपणही पोहोचूच तेवढ्यात..”
“हं..”
अदिती खिडकी बाहेर बघत म्हणाली..
तिला
पाहिलं कि सोहमला नेह्मी प्रश्न पडायचा हिला आपल्याबद्दल काही वाटतं कि नाही.. ती
सोहमशी छान वागायची.. पण त्यात तरीही एक परकेपणा होता.. तसं पहायला गेलं तर ती
सोहमच्या प्रत्येक प्रोग्रामचा भाग व्हायची.. त्याच्या सोबत बाहेर जायची.. तिच्या
मित्रांना तो तिचा बॉयफ्रेंड आहे हे आवर्जून सांगायची.. पण तरीही त्यांच्यात
गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंड सारखी बात नव्हती.. गोष्ट फक्त फिझीकल जवळीक असण्याबाबत
नव्हती.. त्यांच्यात जणू काही कनेक्शनच नव्हतं.. सोहम तिला आनंद मिळेल असं काहीतरी
करण्याचा सतत प्रयत्न करत असायचा.. हि पिकनिकहि त्याने याच उद्देशाने अरेंज केली
होती कि अदिती खूष होईल.. पण अजून तरी त्याला तसं कुठलंच चिन्ह दिसत नव्हतं..
“स्वीटी..
आर यु ऑलराईट..” सोहमने न रहावून विचारलं..
“येस..
मला काय झालंय.. आय अॅम गुड..” तिने सोहमशी बोलून पुन्हा खिडकीबाहेर पाहिलं आणि
तिला पुन्हा ते दोघं दिसले..
आकाश
आणि आभा.. बाईकवरून जात होते.. आभा मागे बसली होती आणि तिने आकाशला घट्ट धरून
ठेवलं होतं.. अदितीच्या मनात पुन्हा तिच अस्वस्थता भरून राहिली.. तिला आभाने
सांगितलं होतं कि ती आकाशची गर्लफ्रेंड नाहीये.. आकाश अदितीच्या पार्टीत तसं बोलून
गेल्यामुळे आभा त्याची गर्लफ्रेंड असल्याचं नाटक करतेय.. पण जर ते खरं होतं तर
आकाश आणि आभा तिला सतत असे का दिसत होते.. काही दिवसांपूर्वी ते तिला बऱ्याच उशिरा
जुहूमध्ये असेच दिसले होते... आणि आता ते दोघं बाईकवर ज्या प्रकारे बसले होते
त्यावरून ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत यात काहीच वाद नव्हता.. मग आभा त्या दिवशी
तिच्याशी खोटं का बोलली होती.. आणि ते खरं होतं तर मग अदितीला हे जे दिसत होतं
त्याचा अर्थ काय होता.. अदिती यामुळे खूप अस्वस्थ झाली होती.. खरं तर तसं व्हायचं
काहीच कारण नव्हतं.. पण तिलाही हे माहित
होतं कि तिचं आकाशवर खूप प्रेम असल्यामुळे असं होतय..
“अरे
ते आभा आणि आकाश आहेत ना..”
सोहमच्या
वाक्याने अदिती भानावर आली.. तिने सोहमकडे पाहिलं..
“कुठे?”
“ते
काय तिथे बाईकवर..” तोवर आकाशची बाईक पुढे निघून गेली होती..
“हो
का.. मी तर पाहिलंच नाही..” अदिती मुद्दामच म्हणाली..
“छान
आहेत दोघं.. मस्त कपल..” सोहम म्हणाला.. अदितीला यामुळे जास्तच अस्वस्थ वाटू
लागलं..
“का?
आपण नाहीओत का?”
“तसं
नाही गं..” सोहमने त्याचं वाक्य पूर्ण करण्याच्या आत अदितीने त्याच्या गिअरवर
असलेल्या हातावर आपला हात ठेवला.. सोहमने तिच्याकडे पहिलं.. ती त्याच्याकडे पाहून
छानसं हसली..
आभा
आणि आकाश, सोहम आणि अदितीच्या आधी कॉलेजला पोहोचले.. तेव्हा बस नुकतीच पोहोचली
होती.. ग्रुप मधली सगळीच मुलं आली होती.. १-२ मुली वगळता मुलींनाही घरून परमिशन
मिळाल्या होत्या.. प्रतीकही आला होता.. ग्रुप मधल्या काही पोरांबरोबर तो जवळच चहा
प्यायला गेला होता.. आकाशने आपली बाईक पार्क केली आणि तो वळला तेव्हाच त्याला
सोहमची गाडी येताना दिसली..
सोहम
ड्राईव्ह करत होता.. आणि त्याच्या शेजारी बसलेली अदिती त्याच्या खांदयावर डोकं
टेकवून बसली होती.. आकाशला हे पाहून खूप अस्वस्थ वाटलं.. त्याला हे माहिती होतं कि
अदिती आणि सोहम कपल आहेत पण त्यांना तो असं पहिल्यांदाच बघत होता.. अदितीवर तो
मनापासून प्रेम करत होता त्यामुळे त्यांना असं पाहून त्याला कससच झालं.. आभा
आकाशकडे पाहत होती.. त्याचा चेहरा पाहून त्याच्या मनाचा अंदाज तिला सहज येत होता..
अदिती
आणि सोहम गाडीतून उतरले तसा घाईघाईत अदितीने सोहमचा हात धरला.. सोहमने आश्चर्याने
तिच्याकडे पाहिलं.. अदिती असं कधीच करायची नाही.. ते बसच्या दिशेने येवू लागले तसा
आकाशनेही आभाचा हात धरला.. आभाने आकाशकडे पाहिलं.. असा हात धरण्यामागे कारण काय
होतं हे ती समजू शकत होती..
एव्हाना
प्रतिक बस जवळ आला होता.. आत्ताच चहाच्या टपरीवर त्याने आकाश आणि आभा, सोहम आणि
अदिती याच्या अचानक लोकांसमोर आलेल्या लव्हस्टोरीचे किस्से ऐकले होते.. त्या आधी
सगळ्यांना आकाश आणि अदितीच कपल आहेत हे कसं वाटायचं याबद्दलच गॉसिपहि ऐकलं होतं..
त्याला स्वत:लाही तसच वाटायचं.. पण मग अचानक अदितीचा एक बॉयफ्रेंड आणि आकाशची एक
गर्लफ्रेंड सगळ्यांच्या समोर आले होते.. त्याने समोर पाहिलं.. तो ज्या
जोड्यांबद्द्ल विचार करत होता त्याचं जोड्या त्याच्या समोरून चालत येत होत्या..
दोन्ही
कपल्स आपल्या पार्टनरचा हात धरून बसच्या दिशेने येत होते.. आकाशने घाईघाईत आपलं जॅकेट
काढलं आणि आभाला घातलं.. हे करताना त्याचं लक्ष अदितीकडे होतं हे आभाला कळत होतं..
तिथे अदिती हे पाहून सोहमला अधिकच बिलगली आणि त्याच्या दंडावरती डोकं टेकवून चालू
लागली..
प्रतिक
हे सारं पाहत होता.. त्याने या चौघांच्या कथा ऐकून जे कयास बांधले होते ते खरेच
असावेत असं त्याला वाटू लागलं.. या दोन्ही जोड्या जे दाखवतायत त्या पेक्षा खूप
काही वेगळं त्यांच्यात शिजतय याची त्याला खात्री वाटू लागली.. प्रतिक स्वत:शीच
हसला..
बसमध्ये
जेव्हा आकाश आणि अदितीने आपण एकमेकांच्या नजरेत येवू या हिशोबाने जागा पटकावल्या
आणि आपापल्या पार्टनरला आपल्या शेजारी बसवत त्यांच्याशी लाडीकपणे बोलायला सुरुवात
केली तेव्हा तर प्रतिकला खूपच मजा आली..
हि
पिकनिक त्याला खूप गमतीजमती दाखवणार होती.. या जोड्यांमुळे.. या जोड्यांसाठी हि
पिकनिक अविस्मरणीय होणार होती.. हा दिवस सगळ्यांना लक्षात राहणार होता..
क्रमशः
Comments
Post a Comment