ओलांडुन जाताना.. भाग-1
सूर्य मावळतिला आला होता.. तिची अस्वस्थता शिगेला पोहोचली होती.. ही त्यांची अखेरची भेट ठरणार होती का एक नविन सुरुवात? याचं उत्तर आजची संध्याकाळ देणार होती.. काल रात्री पासून हा प्रश्न तिल सतावत होता.. कालची 31 डिसेम्बरची रात्र..
ती न्यू इयर पार्टी अणि त्या पार्टीत तिने त्याच्या हातात ठेवलेलं ते पत्र.. बाराचे ठोके पडत होते आणि त्याला मीठी मारून Happy New Year wish करून सिंड्रेल्ला सारखी पार्टी मधून पळतच ती निघाली होती.. उत्तराची वाट न बघता.. तेव्हापासूनच ही अस्वस्थता तिच्या मनात घर करून राहिली होती..
खरं तर त्या दोघांची भेट झाली तेव्हा पासूनच ही अस्वस्थता तिच्यात घर करू लागली होतीच.. कारण ती पाहताच त्याच्या प्रेमात पडली होती.. त्या घटनेला वर्ष उलटलं आता.. ते या सोसायटीत rent वर जागा घेवुन रहायला आले होते.. ती, तिचे आई बाबा आणि मोठा भाऊ..
त्यांच कुटुंब तसं अप्पर मिडल क्लास मधे गणता येइल असं.. वडिल बँकेत कामाला.. तिन वर्षांपूर्वी त्यांची मुंबईत बदली झालेली आणि तेव्हा पासूनच त्यांचा हा विंचवाच्या बिर्हाडाचा प्रवास सुरु झाला.. दर वर्षी जागा घ्यायचं प्लानिंग पण कुठे न कुठे माशी शिंकणार हे ठरलेलं..
आई house wife तर भाऊ सध्या final ला.. ती सध्या अकरावी arts ला शिकतेय.. तशी ती हुशार पण आर्टस घ्यावं लागलं कारण तिला दहावीला मार्क खूप कमी पडले होते.. याचं सगळयांना आश्चर्य वाटलं.. पण तिल माहिती होतं हे असच होणार आहे.. त्याच्यामुळे.. तो आर्टस ला होता.. तिल जास्त मार्क मिळाले असते तर घरच्यांनी तिल जबरदस्ती science नाहीतर commerce घ्यायला भाग पडलं असतं.. म्हणुन मग तिचं हे छोटसं सीक्रेट.. ठरवून मार्क कमी मिळवले तिने आणि त्याच्याच कॉलेजला admission घेतलं..
तो तेरावीत होता तरीही... तिचे कॉलेजचे पाहिले सात महीने मस्त गेले होते.. त्याच्या सोबतचा प्रवास, हुशारीने त्याच्या ग्रुप मधे मिळवलेली एंट्री, ग्रुप बरोबर म्हणजेच त्याच्याबरोबर केलेला
टाइम पास.. तिल वाटलं होतं एव्हाना तो प्रपोज करेल.. पण तो लाजाळुचं झाड.. तिलाही डायरेक्ट कसं बोलावं हा प्रश्न.. शेवटी तिची ही पहिलीच वेळ..
पण आता तिलाच राहवेना.. तिने पत्र लिहायचं ठरवलं.. 31 डिसेम्बर च्या पार्टीत त्याला द्यायचं ते.. ती तिची लेट नाईट पहिली पार्टी असणार होती.. भाऊ बारा वाजता घ्यायला येणार होता.. तो पर्यंत ती आणि तिचा ग्रुप.. तीच वेळ योग्य होती.. बाराच्या ठोक्याला तिने पत्र दिलं आणि भावासोबत ती निघून आली..
त्या पत्राचं उत्तर तिल आज कॉलेजच्या गच्चीवर मिळणार होतं.. ती त्याचीच वाट बघत उभी होती.. बराच उशीर झाला होता.. इतक्यात गच्चीवर तिल कुणाचीतरी चाहुल जाणवली.. तो आला!! तिच्या मानाने उसळी खाल्ली.. तिने उत्साहात वळुन पाहिलं.. पण तो नव्हता.. त्यांच्या ग्रुप मधली सुधा होती ती.. तिला आश्चर्य वाटलं.. ही या वेळी इथे कशी??
सुधा एक पत्र घेउन आली होती.. त्याचं पत्र.. सुधा पत्र देऊन निघून गेली आणि ती अधिकच confused झाली.. याचा काय अर्थ?? तिने पत्र उघडलं.. त्याच वळणदार अक्षर ती कुठेही ऒळखु शकली असती.. ती पत्र वाचू लागली..
आभा,
काल तू असं अचानक पत्र देऊन गेलीस.. मला दोन मिनिट काहि कळलं नाही.. मी पत्र वाचलं.. छान लिहितेस तू.. नेटक्या शब्दात.. अर्थ पूर्ण.. मला तसं नाही लिहिता येणार.. गोड पाकात घोळुन गोष्ट मांडण्याची हातोटी माझ्याकडे नाही.. म्हणुन थेट सांगतो..
तुला जसं वाटतय तसं आपल्यात काही नाही होउ शकत.. तू छान आहेस.. सुन्दर आहेस.. तुला अजुन बेटर कुणीतरी नक्की मिळेल.. पण माझ्या मनात तुझ्या बाबतीत खरच तसं कहिहि नाहीये..
सॉरी!! पण आपली मैत्री अशीच राहिल.. मला खात्री आहे.. तुझं मन दुखावल्याबद्दल पुन्हा सॉरी..
तुझा मित्र
आकाश.
दुरवर धडधडत जाणार्या ट्रेनचा आवाज संध्याकाळच्या आकाशात भरुन राहिला होता.. संध्याकाळ कसली रात्राच झाली होती आता.. तिचे पाण्याने भरलेले डोळे काळोखात कुणालाही दिसणार नव्हते.. मान खाली घालून, एका हाताच्या मुठित ते पत्र घट्ट धरून ती स्टेशनच्या दिशेने निघाली होती.. भोवतालच्या गर्दित एकटी.. हरलेली.. मनातून मोडलेली..
क्रमश:
Comments
Post a Comment