Posts

Showing posts with the label LoveStory Love Teen College RandonWriting Episode 14

ओलांडून जाताना... भाग-१४

Image
आभाच्या वर्गात सोशॉलॉजीचा क्लास सुरु होता.. अय्यर सर आपल्या विचित्र शैलीत शिकवत होते.. हे सर एकदम कुल होते.. त्यामुळे पोरं एन्जॉय करत होती.. कमेंट्स करत होती.. सरही त्यावर काहीतरी जोक मारत होते.. असा खेळीमेळीत वर्ग सुरु होता.. आभा हे सारं एन्जॉय करत होती.. कॉलेजमधला आधीचा सगळा वेळ तिने आकाशच्या मागे घालवला होता.. तेव्हा हे सगळं किती अनइंपॉर्टन्ट वाटायचं.. पण आता क्लासरूम मधली गम्मत तिला कळत होती.. काही नकचढ्या वाटणाऱ्या मुली आता तिच्याशी बोलू लागल्या होत्या.. हे ती क्लासमध्ये जास्त वेळ घालवू लागली होती म्हणून झालं होतं का ती प्रतिष्टीत असा ड्रामा सर्कलची मेंबर झाली होती म्हणून झालं होतं हे काही आभाला सांगता आलं नसतं.. पण हळूहळू तिचा असा एक ग्रुप बनू लागला होता.. क्लासरूममधे ती त्यांच्यासोबत मज्जेत टाईमपास करत होती.. जणू तिची दोन आयुष्य होती.. हे एक अकरावीतल्या मुलीचं क्लासरूम मधलं आयुष्य.. आणि दुसरं आकाश भोवती फिरणारं.. ड्रामाग्रुप मधे रमणार.. आणि दोन्हीही आयुष्य ती पूर्णपणे एन्जॉय करत होती.. लेक्चर संपवून ती क्लासबाहेर पडली तेव्हा ड्रामाग्रुपचा एक मुलगा दारात तिचीच वाट बघत उभा...