ओलांडून जाताना... भाग-३०
“सांगितलं ना.. नाही लागणार फोन इथे.. आणि हो.. गाडीचं म्हणशील तर मीच ती घरी पाठवली आहे.. म्हंटल मीच सोडेन तुला घरी..” सोहमने अदितीला थेटरच्या पार्किंगमध्ये गाठलं होतं.. आज तो मनाशी बरंच काही ठरवून आला होता.. त्याने तिची गाडी घरी पाठवून दिली होती आणि तिला सुनसान अशा पार्किंगमध्ये अचानक भेट दिली होती.. त्याचा आजचा एकंदर आविर्भाव नेह्मीसारखा नव्हता.. त्याच्याबाबतीत काहीतरी विचित्र आदितीला जाणवत होतं.. त्यामुळे अदिती जास्तच अस्वस्थ झाली.. तिने इथून बाहेर पडण्याचा मार्ग कुठे आहे ते पाहिलं.. तो नेमका सोहमच्या मागे होता.. अदितीला काय करावं सुचत नव्हतं.. सोहमचा चेहरा आता चांगलाच कठोर झाला होता.. “खूप खेळ खेळलीस तू माझ्या बरोबर.. पण आता..” तो शांतपणे तिच्या दिशेने चालत येवू लागला.. अदिती समोर आता कुठलाच मार्ग नव्हता.. काय करावं तिला काहीच सुचत नव्हतं.. सोहम तिच्या दिशेने येत बोलू लागला.. “पण आता मला उत्तरं हवी आहेत.. मी तुला अनेकदा प्रपोझ केलं होतं अदिती.. दरवेळी तू मला नकार दिलास.. पण तरीही मी खूष होतो.. तुझं प्रेम मी कधीतरी मिळवेन हि आशा होती त्यात.. ती नकार खरचं बरा होता अ...