ओलांडून जाताना... भाग-६
विधीशाच्या घरात गहन चर्चा रंगली
होती.. विधीशाचे आई वडील आणि आभाचे आई वडील मलेशियाची परिस्थिती आणि भारताची
परिस्थिती यावर गहन चर्चा करण्यात बिझी होते.. रुमच्या एका कोपर्यात आभाचा भाऊ
तितक्याच अलिप्तपणे विधीच्या iPad वर कुठला तरी गेम खेळण्यात बिझी होता.. इतक्यात
आभा आत आली.. तिच्या येण्याचा फोर्स असा होता कि सगळ्यांच तिच्याकडे लक्ष गेलं..
सगळ्यांच्या नजरा तिच्यावर फिरल्यामुळे ती थोडी अवघडली.. मग कसं नुसं हसत म्हणाली “निघूया
का.. उद्या कॉलेज आहे ना..”
सगळ्यांसाठी हि आश्चर्याची गोष्ट
होती.. विधीकडे आल्यावर आभा जायचं नाव काढायची नाही.. किती वेळा ओवर नाईट स्टे
करून सकाळी परस्पर कॉलेजला जायचा कार्यक्रम आखायची.. आणि आज थेट निघायची गोष्ट..
इतक्यात विधीशाही तिथे आली.. ती अतिशय नॉर्मल वाटत होती.. विधीशाची आई उठून डिनर
सेट करायच्या कामाला लागली.. जाता जाता तिने विधीशाला बोलावलं..
“काय गं.. भांडण झालं का तुमचं?”
कुणाला ऐकू येणार नाही अशा आवाजात तिने विचारलं..
“काही खास नाही गं.. असंच..”
विधीशाने डोळा मारत आईला सांगितलं..
जेवण उरकून आभाची Family निघाली
तेव्हा आभा विधीशाला साध बायहि म्हणाली नाही.. विधीशाला आभाच्या वागण्याचं खूप हसू
येत होतं.. पण आभा मात्र मनातून प्रचंड रागावली होती.. आधी आकाश आणि नंतर आता
विधीशानेही तिच्या भावनांशी खेळच केला होता.. सगळे तिच्याशीच असं का वागतायत.. तिच्यासोबत
सगळच असं का चुकतय? हे नवीन वर्ष अजून काय मनस्ताप घेऊन येणार आहे हे तिला कळत
नव्हतं.. तिला त्याचा विचारही करवत नव्हता.. करायचा नव्हता.. असं असलं तरी घरी
पोहोचेपर्यंत ती तोच विचार करत होती.. आणि इतका वेळ त्याच विषयावर विचार करूनही
तिचे विचार काही संपत नव्हते.. जणू एक लूप लागलं होतं.. त्याच त्याच विचारांचं चक्र..
तीने झोपायला बेडवर अंग टाकलं आणि एका प्रकारच्या नेगेटीव्हिटीने तिला घेरलं..
शरीराने ती बिछान्यावर असली तरी मानाने ती अजूनही विधिशा सोबत तिच्या घराच्या
मागच्या अंगणातच होती.. विधीशाचा एक एक शब्द तिच्या कानात घुमत होता..
आभाने तिला सारी कथा सांगितली होती..
आकाशने आभाला दिलेला नकार, अदिती नावाच्या मुलीवर त्याचं असलेलं प्रेम.. तिच्या
आयुष्यात आधीच असलेला सोहम.. हा नकार न पचवू शकलेला आकाश.. आणि आपणही काही कमी
नाही हा स्वत:चा मेल इगो वाचवण्यासाठी आकाशने सांगितलेलं खोटं कि आभा त्याची
Girlfriend आहे.. आणि वरून हे त्याचं Statement खरं आहे हे Prove करण्यासाठी
त्याने आभालाच त्याची Girlfriend असल्याचं नाटक करण्याची विनंती केली होती..
हा काय खेळ होता का.. सिनेमा आणि
कथा कादंबर्यांमध्ये अशा गोष्टी शोभून दिसतात.. खर्या आयुष्यात नाही.. आभाचा राग
राग होत होता.. कुणाकडे मनही मोकळ करता येत नव्हतं.. आणि जेव्हा तिने विधीशाकडे मन
मोकळं केलं तेव्हा तिला तिच्याकडून अजूनच विचित्र सल्ला मिळाला.. ज्या गोष्टीचा
आभाला राग आला होता.. जी गोष्ट करायचा ती कधी विचारही करू शकणार नव्हती..
विधीशाच्या मते तिने तेच करायला हवं होतं.. आभाने आकाशची Girlfriend बनून जायला हवं
होतं..
“वेड लागलय का विधिशा तुला.. have
you gone Mad? मी तुला सांगतेय कि त्याच्या अशा विचारण्याचा मला राग आलाय आणि तू
सांगतेयस कि मी तिच गोष्ट करू.. वा.. आणि याने मिळणार काय मला.. त्रास, मन:स्ताप..”
“किंवा कदाचित आकाशच प्रेम..”
आभाला हे अपेक्षित होतंच.. या
वाटेवर जावून तिनेही विचार केला होता.. आकाशच्या या वागण्याचा तिला खूप राग आला
होता.. पण तरीही ती आकाशवर खरच प्रेम करत होती.. आपण त्याच्यावर किती जेन्युअनली
प्रेम करतो हे तिला आकाशला दाखवून द्यायचं होत आणि हे नाटक त्यात आपल्याला मदत करू
शकेल असा विचार तिच्याही मनात आला होता.. पण ती त्या बाबत शुअर नव्हती.. तिला ते
खूपच फिल्मी वाटत होत.. पण विधीशाकडून तोच रीस्पॉन्स आल्यावर तिच्या मनातल्या
आशेला पुन्हा चालना मिळाली होती..
“म्हणजे तुला काय म्हणायचय.. या
नाटका दरम्यान त्याला जाणवेल कि मी आदितीपेक्षा किती बेटर आहे आणि त्याच्यावर किती
जास्त प्रेम करते.. आणि Finally He will Fall for Me.. तो येवून मला I Love You
म्हणेल? असं खरच होईल?”
विधिशा हे ऐकून छानसं हसली..
“I am Impressed.. तुझ्या Situation
वर तू असाहि विचार करतेयस.. ग्रेट.. But Its too Typical.. माझ्यासारख्या
सायकलॉजीच्या स्टुडन्टसाठी तर जरा जास्तच.. मी यापेक्षा जरा वेगळा विचार करतेय..”
आभाने प्रश्नार्थक नजरेने
तिच्याकडे पाहिलं.. विधिशाच्या चेहऱ्यावर आता तो खट्याळपणा नव्हता.. ती कसलातरी
विचार करत होती.. गंभीरपणे.. तिने आभाकडे पाहिलं आणि ती पुढे बोलू लागली..
“आकाश त्या दिवशी येवून तुला हेही
म्हणू शकला असता कि माझं चुकलं.. मी ते पत्र तुला लिहिलं.. मला जाणवलय कि माझही
तुझ्यावर खरोखर प्रेम आहे.. आणि त्याचं काम सहज झालं असत.. पण त्याने येवून तुला
हि सगळी खरी खरी स्टोरी सांगितली.. का?”
आभाला हा प्रश्न पडलाच नव्हता..
आकाश जेव्हा घरी आला होता तेव्हा खरं तर तो असचं काहीतरी बोलेल अशी अपेक्षा तिनेही
केली होती.. आणि तसं झालं असत तर तीने त्यावर विश्वास ठेवलाही असता.. पण मग आकाशने
हे का नाही केलं.. कदाचित..
“त्याला माझी खरच काळजी वाटत
असेल.. किंवा त्याला हे कुणासोबत तरी शेअर करायचं असेल..”
“चूक.. त्याने तुला सगळं खरं
सांगितलं कारण त्याला या खेळात तुझ्याकडून कुठल्याही प्रकारची attachment नको आहे..
त्याला Easily Move on होता यावं म्हणून त्याने हि काळजी घेतलीय.. तू जसे फिल्मी
अंदाज बांधलेस ना तसे त्यानेही बांधलेयत..”
“म्हणजे.. त्यानेही माझ्यासारखा
विचार केलाय..”
“Yes Baby! पण तू तो विचार
त्याच्या जवळ कसं जाता येईल या वे ने केलायस.. तर त्याने हा विचार या गुंत्यात न
अडकता कसं सेफ राहता येईल या वे ने केलाय.. त्यामुळे तू म्हणतेयस त्या टिपिकल वे
ने तू गेलीस तर I am sure he will never fall for you..”
आभाने मघाशी जसा विचार केला होता
तसं विधिशा आता काहीच बोलत नव्हती.. हे संभाषणसुद्धा वेगळाच मार्ग पकडत होतं.. तिचं
मेस्ड अप झालेलं आयुष्य सुधरेल, आकाश तिच्या जवळ येईल असा काही सल्ला विधिशा
आपल्याला देईल असं तिला वाटत होतं.. पण विधिशा जे सांगत होती त्यावरून आकाश
आभापासून खरच पळतोय असंच जाणवत होतं.. आभाला हे ऐकूनच टेन्शन आलं..
“म्हणजे? आकाश will never Love me?”
“त्या मार्गाने तर नाही.. हा.. पण
माझ्या डोक्यात जी कल्पना आहे त्या मार्गाने गेलो तर कदाचित चान्सेस आहेत..”
“काय करायचं? What you have in
your Mind??”
“तू उद्या त्याच्या मदतीला जायचं..
पण हे नाटक करण्याआधी त्याच्याकडून एक प्रॉमिस घ्यायचं..”
“प्रॉमिस.. काय?”
“हेच.. कि तो कधीही तुझ्या प्रेमात
पडणार नाही..”
आभाला आपण जे ऐकतोय ते बरोबर आहे
कि नाही हेच कळत नव्हत..
“काय?”
“हो.. त्याने कधीही तुझ्या प्रेमात
पडायचं नाही.. तो जर हे वचन देणार असेल तरच तू त्याला मदत करायचीस..”
“विधिशा what is this nonsense.?
जो प्रेमात पडावा असं वाटतंय त्यालाच...”
विधीशाने तिच बोलण मधेच कापलं..
“आभा.. माझं ऐकून घेशील का आधी..”
खरं तर आभालाही तिचा हा जगावेगळा
प्लान ऐकायचाच होता..
“बोल..”
आणि विधिशा तिच्या डोक्यात काय
शिजतंय ते सांगू लागली.. तिच्या प्लानची फक्त सुरुवातच विचित्र नव्हती तर तो अख्खा
प्लानच आभाला ‘बे सिर पैर’ असा वाटत होता..
“आणि If everything goes correct..
आकाश समोरून येवून तुला प्रपोज करेल..”
विधीशाने आपलं बोलणं संपवलं..
आभाला तिच्या प्लानमुळे बसलेल्या शॉक मधून सावरायला दोन क्षण गेले..
“विधिशा मला वाटतं ती सायकलॉजीची
पुस्तकं वाचून तुझ्याच डोक्यावर परिणाम झालय.. Do you really think कि हा असा
मूर्खपणा केल्यावर आकाश समोरून येवून मला प्रपोज करेल..?”
“Indeed baby.. हे ऐकायला कितीही
विचित्र वाटलं तरी हा एकाच मार्ग आहे.. आभा.. I want to make you his true love..
तू option मत बन यार.. अदिती नाही म्हणून आभा ऐसा मेरेको नाही चाहिये..”
“पण तू जे म्हणतेयस त्या मार्गाने
तर अदिती असली काय किंवा नसली काय माझा नंबर लागण्याचा चान्स अजिबातच दिसत
नाहीये..”
“अरे You Belive Me.. मी म्हणतेय
तसच होईल..”
आभाला आता हो चर्चा लांबवायची
नव्हती.. विधिशा जे काही बोलतेय त्याला काहीच अर्थ नाहीये या बद्दल तिला खात्री
वाटू लागली होती.. वर ज्या मार्गाने जावून आपल्याला आकाश मिळेल अशी पुसटशी आशा
तिला होती तोच मार्ग विधीशाने पूर्णपणे बाद करून टाकला होता..
“छोड विधी.. Thanks for whatever
you did.. पण मी ह्या सुईसायडल प्लानला नाही फॉलो करू शकत..”
“अरे पण..”
“राहूदे विधी.. We will talk
later..”
इथे त्याचं संभाषण जे तुटलं ते
तुटलचं.. पण तरीही विधीशाच्या चेहऱ्यावर आभा जाईपर्यंत एक हसू होतं.. एक गूढ हसू..
काय होतं तिच्या मनात? ती का हसत असावी? आभा रात्री झोप येईपर्यंत त्याचाच विचार
करत होती..
तिथे विधिशा मात्र जागी होती.. खेळ
सुरु होणार होता.. आणि तिची भूमिका फार मोठी नसली तरी फार महत्वाची असणार होती यात
तिला शंका नव्हती.. बरीच पुस्तकं भोवती मांडून ती नोट्स काढत बसली होती.. त्यात
खरोखरच काही romantic कादंबर्याही होत्या.. तिच्या डोक्यात एक रंजक डाव शिजत
होता.. आणि तिचं गणित बरोबर असेल तर उद्याच त्या डावातली पहिली खेळी खेळली जाणार
होती..
तिच्या चेहऱ्यावरच हसू अजूनही तसच
होतं.. कदाचित उद्या काय घडणार आहे हे तिला आधीच कळल होतं..
क्रमशः
Comments
Post a Comment