Posts

Showing posts with the label LoveStory Love Teen College RandonWriting Episode 28

ओलांडून जाताना.. भाग-२८

Image
मघापासून भरलेला थेटरबाहेरचा सगळा परिसर आता एकदम ओस पडला होता.. स्पर्धेची तिकिटं मिळू न शकलेले काही लोक बाहेर अजूनही वाट पाहत होते.. तिकिटांच्या बाबतीत काही होवू शकतंय का हि शक्यता पडताळून पाहत होते.. पण आत दुसरी एकांकिका सुरु झालेली असल्यामुळे त्याची काहीच शक्यता नव्हती.. थेटरच्या मागच्या बाजूला जिथे आभाच्या कॉलेजची बस उभी होती तिथेहि खूप लगबग सुरु होती.. पुढे ज्यांच्या ज्यांच्या एकांकिका होत्या ते सारे अतिशय एक्सायटेडली तयाऱ्यानां लागले होते.. आभाच्या कॉलेजच्या बसमध्येही त्यांची चक्री सुरु होती.. एकप्रकारच टेन्शनचं वातावरण होतं.. चुकत कुणीच नव्हतं.. पण दडपणाखाली सगळेच होते.. मोबाईलवर एकांकिकेच्या मधली गाणी वाजवून डान्सर्स मनातल्या मनात गाण्यांची प्रॅक्टिस करत होते.. डायलॉग्जचं टायमिंग त्यावर मॅच केलं जात होतं.. एकांकिकेची अशी बैठी तालीम अर्ध्यावरच आली होती आणि इतक्यात प्रतीकचा फोन वाजला.. प्रतीकने खुणेनेच सगळ्यांना तालीम कंटिन्यू करायला सांगितली आणि तो फोनवर बोलू लागला.. “हां.. रोहन बोल..” रोहन हा एकांकिकेच म्युझिक ऑपरेट करणारा होता.. तो थेटरच्या वरच्या मजल्यावरच्या एका पॅसेजम...