Posts

Showing posts with the label LoveStory Love Teen College RandonWriting Episode 29

ओलांडून जाताना... भाग-२९

Image
थेटरच्या बाहेर बरीच वर्दळ दिसत होती.. चौथी एकांकिका आत्ताच संपली होती आणि लोक तिच्यावर चर्चा करण्यात रंगले होते.. कुणी सिगरेट ओढत होतं.. पहिल्या दोन एकांकिकेमधली काही पोरं तिथेच पु.लं.च्या पुतळ्या जवळ झोपली होती.. “आभा.. तू खरंच रागावली नाहीएस ना माझ्यावर.. तो वर्षभरापूर्वीचा पासवर्ड आहे गं..” आभा आकाशच्या इमेल आयडी वरून एकांकिकेच म्युझिक घेवून आल्यापासून आकाश सातव्यांदा हे बोलत होता.. त्याच्या इमेल आयडी ओपन करण्यासाठी आभाला आकाशच्या पासवर्डची गरज होती.. तो त्याने दिलाही.. पण त्यामुळेच सगळा गोंधळ सुरु झाला होता.. कारण आकाशचा पासवर्ड होता ‘ADITI0101’.. “आकाश.. मी सांगितलं न तुला मी चिडले नाहीये अजिबात..” आभा खरोखरंच चिडली नव्हती.. तीही समजू शकत होती कि असं घडण्यात आकाशची काहीच चूक नाहीये.. असं कुणासोबतही होवू शकतं.. “म्हणजे तू एकांकिका संपल्यावर मला पु.लं.च्या पुतळ्याजवळ भेटशील ना?” आकाश तिच्या पहिल्या वहिल्या स्टेज परफॉर्मन्स नंतर तिला तिथे प्रपोज करणार होता आणि हे तिलाही माहित होतं.. आभाने त्याच्या या प्रश्नावर होकारार्थी मान हलवली.. आकाशचा चेहरा खुश झाला.. “आभा.. ना...