ओलांडून जाताना... भाग-३०
“सांगितलं ना.. नाही लागणार
फोन इथे.. आणि हो.. गाडीचं म्हणशील तर मीच ती घरी पाठवली आहे.. म्हंटल मीच सोडेन
तुला घरी..”
सोहमने अदितीला थेटरच्या
पार्किंगमध्ये गाठलं होतं.. आज तो मनाशी बरंच काही ठरवून आला होता.. त्याने तिची
गाडी घरी पाठवून दिली होती आणि तिला सुनसान अशा पार्किंगमध्ये अचानक भेट दिली
होती.. त्याचा आजचा एकंदर आविर्भाव नेह्मीसारखा नव्हता.. त्याच्याबाबतीत काहीतरी
विचित्र आदितीला जाणवत होतं..
त्यामुळे अदिती जास्तच
अस्वस्थ झाली.. तिने इथून बाहेर पडण्याचा मार्ग कुठे आहे ते पाहिलं.. तो नेमका
सोहमच्या मागे होता.. अदितीला काय करावं सुचत नव्हतं.. सोहमचा चेहरा आता चांगलाच
कठोर झाला होता..
“खूप खेळ खेळलीस तू माझ्या
बरोबर.. पण आता..”
तो शांतपणे तिच्या दिशेने
चालत येवू लागला.. अदिती समोर आता कुठलाच मार्ग नव्हता.. काय करावं तिला काहीच सुचत नव्हतं.. सोहम
तिच्या दिशेने येत बोलू लागला..
“पण आता मला उत्तरं हवी आहेत..
मी तुला अनेकदा प्रपोझ केलं होतं अदिती.. दरवेळी तू मला नकार दिलास.. पण तरीही मी
खूष होतो.. तुझं प्रेम मी कधीतरी मिळवेन हि आशा होती त्यात.. ती नकार खरचं बरा
होता अदिती.. पण हा होकार.. या वेळी तू दिलेला होकार इतका त्रास देणारा का होता
अदिती? का?” तो अदितीच्या दिशेने येत येत बोलु लागला तशी अदिती मागे मागे जावू
लागली..
“मी वेड्यासारखं प्रेम केलं
तुझ्यावर आणि तू.. तू कधीच प्रेम केलं नाहीस का माझ्यावर.. काय चुकलं माझं अदिती
सांग ना.. प्लीज..”
अदितीला आता रडू फुटलं.. ती
त्या अवस्थेत सोहमशी बोलू लागली..
“तुझी काहीच चूक नाही यात
सोहम.. चूक माझीच आहे.. मी खरंच नाही रे तुझ्यायोग्य..”
“पण मला तूच हवी अशील तर
अदिती? तर? मी तुझ्यासाठी स्वत:मध्ये काहीही बदल करायला तयार असेन तर? सांग ना..
सांग मी काय करू ज्याने सारं परत पहिल्यासारख होईल अदिती..”
“सोहम आता काहीच
पहिल्यासारख होवू शकत नाही.. सगळं बदललय कायमचं..”
“का बदललं अदिती.. सांग
ना.. काय चुकलं माझं.. आपण पुन्हा बदलूया ना सगळ..” सोहम आता अधिक एग्रेसिव्ह झाला
होता.. अदितीला त्याची भीती वाटू लागली होती.. ती मागे मागे जात होती.. पण माघच्या
भिंतीपासून आता काहीच अंतर उरलं होतं..
“सोहम प्लीज..”
“अदिती प्लीज.. तू सांग
ना.. काय झालं आपल्यात.. का कधीच प्रेम केलं नाहीस तू माझ्यावर? वॉज ऑल दॅट फेक?
सांग ना.. सांग ना अदिती..?”
“सोहम..!!” अदिती त्रासून
म्हणाली..
“अदिती मला उत्तर हवय.. आज
ते मिळाल्याशिवाय मी जाणार नाही इथून.. “ सोहम आता न थांबता बोलत सुटला होता..
अदिती पूर्णपणे भंडावून गेली होती.. इतक्यात ती मागे जाताजाता पार्किंगच्या भिंतीवर
धडकली.. आता मागे जायला मार्ग नव्हता.. सोहम कंटिन्यूअस बोलत तिच्या दिशेने येतचं होता..
अदितीला हे सगळं असह्य होत होतं.. सोहम तिच्या अगदी जवळ आला आणि अदिती अखेर
वैतागून ओरडली..
“कारण मी कधीच तुझ्यावर
प्रेम केलं नाही सोहम.. मी नेहमीच आकाशवर प्रेम केलं..”
सोहम होता तिथेच थांबला..
त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू पसरलं..
“आकाश.. मला वाटलंच होतं..
आकाश.. त्याच्यासाठी तू माझा वापर केलास अदिती..”
“आय अॅम रिअली सॉरी.. पण..
मला तुला दुखवायचं नव्हतं.. मला फक्त आकाशबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून स्वत:ला बाहेर
काढायचं होतं..”
“म्हणून तू हा खेळ खेळलीस
माझ्याबरोबर.. वा.. वा अदिती..”
“आय अॅम सॉरी सोहम.. खरंच..
सॉरी..”
“सॉरी म्हणून भागणार नाहीये
अदिती.. तू या खेळात उगाच मला इनव्हॉल्व केलस.. हा खेळ तू सुरु केलास.. आता मी हा संपवणार..” त्याच्या डोळ्यात एक वेगळीच
चमक दिसत होती.. तो अदितीच्या अजून जवळ गेला आणि त्याने तिचा हात धरला..
आभा मेकअप वगैरे उतरवून
तयार होवून ठरल्याप्रमाणे पु.लं.च्या पुतळ्याजवळ आली.. पण बाहेर कुणीच नव्हतं..
रात्रीचे दोन वाजून गेले होते.. आत सहावी एकांकिका सुरु झाल्यामुळे प्रेक्षक आत
गेले होते.. काही मुलं पु.लं.च्या पुतळ्याच्या चौथर्यावर झोपली होती.. आभाने इथे
तिथे पाहिलं.. आकाशच पत्ता नव्हता.. तिच्या चेहऱ्यावरच हसू मावळल.. ती जायला वळणार
तोच कुणीतरी मागून तिचे डोळे मिटले..
“आकाश?” तिने डोळ्यांवरचा
हात काढून मागे वळून पाहिलं.. तो आकाशच होता.. त्याच्या चेहऱ्यावर छान हसू होतं..
त्याने एक हात स्वत:च्या मागे लपवला होता.. त्याने तो पुढे आणला.. त्यात एक लाल
गुलाबांचा सुंदर गुच्छ, आणि काही हार्टशेप्ड बलून होते.. आभाला आश्चर्यच वाटलं..
रात्रीचे दोन वाजता हे याने कुठून पैदा केलं.. आधी बसमध्ये किंवा इतर कुठेही हे
तिला दिसलं नव्हत..
“हे काय आकाश? हे कुठून?”
तिने हसून विचारलं..
“ तू म्हणाली होतीस ना..
तुला हा क्षण स्पेशल असायला हवा आहे..” आभाला हे सारं खूप रोमॅन्टिक वाटत होतं..
आकाशने यासाठी खरंच मेहनत केलेली दिसत होती.. आकाशने तिच्याकडे पाहिलं.. आभा छानसं
लाजली..
आकाश काय विचारणार आहे हे
तिला माहिती होतं.. ती काय उत्तर देणार आहे हेही तिने ठरवलं होतं.. पण तरीही
आकाशने ते विचारावं यासाठी ती थांबली होती..
“आभा..” आकाश म्हणाला आणि
अचानक तिच्यासमोर गुढघ्यावर बसला.. “ I Love You a lot!! Will You Be My Girlfriend..” आकाशने थेट विचारून टाकल.. त्यात
कुठले आढेवेढे नव्हते आणि कुठली शेरोशायरीहि नव्हती.. पण तरीही आभाला त्याचा
प्रामाणिकपणा फार भावला.. तिने काय उत्तर द्यायचं ते मनातच ठरवलं होतं..
“आकाश..”
“थांब
आभा..” आभा काही बोलणार तोच कुणीतरी ओरडलं.. आकाश आणि आभाने त्या दिशेला पाहिलं..
तो सोहम होता.. त्याने अदितीचा हात धरलेला होता आणि तो अदितीला घाईघाईत तिथे घेवून
येत होता.. आभा आणि आकाश दोघंही त्या दोघांना इथे पाहून शॉक झाले..
“आकाश..
प्लीज.. देअर इज अ बिग मिसअंडरस्टँडिंग आकाश..” सोहम त्यांच्या जवळ येता येता बोलत
होता.. “यु हॅव तू लिसन दिस बिफोर यु टेक एनी डिसिजन..”
“लिव्ह
इट सोहम.. आता काही फायदा नाहीये त्याचा..” अदिती सोहमला सांगत होती..
“एक
मिनिट.. काय चाललय हे..” आकाश आणि आभाच्या या स्पेशल मोमेंटची वाट लागल्यामुळे
आकाश चांगलाच वैतागला होता.. “सोहम तुम्ही जरा जाल का.. आम्ही इथे महत्वाचं
बोलतोय..”
“मी
हि तुला महत्वाचंच काहीतरी सांगायला आलोय आकाश.. आकाश.. अदिती.. अदिती रिअली लव्हज
यु आकाश..” सोहम कळकळीला येवून म्हणाला.. आकाशला या सगळ्याचा अर्थ काय तेच कळत
नव्हतं.. हा अदितीचा बॉयफ्रेंड होता जो अचानक गायब झाला.. आता पुन्हा आलाय आणि सांगतोय
कि अदितीचं आकाशवर प्रेम आहे.
“सोहम..
हे सगळं काय आहे..”
“फॅक्ट..
निव्वळ फॅक्ट आहे आकाश.. अदितीचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे.. तिचा जेन्युअन
प्रॉब्लेम होता म्हणून ती..”
“एकमिनिट
सोहम.. पण ती तर तुझी गर्लफ्रेंड आहे ना.. मग हे सगळं..”
“तिने
केव्हाच माझ्याशी ब्रेकअप केलय आकाश.. मलाही याचं गोष्टीचा राग आला होता.. पण.. पण
आता मला तिचा खरा प्रॉब्लेम कळलाय आकाश.. अदितीने हे सगळं केलं कारण..”
“बस
यार.. किती खोटं बोलणार तुम्ही..” आकाशने त्याला मध्येच थांबवलं.. त्याला हे सारं
नकोसं झालं होतं हे त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं.. “आधी हि अदिती.. माझ्याशी
गोडगोड वागली.. मी प्रेमात पडलो.. तर तुला बॉयफ्रेंड म्हणून समोर आणला.. मला अशा
पेचात पडलं कि मला आभाला आपली गर्लफ्रेंड बनवून आणवं लागलं.. मग आमच्यात प्रेम
डेव्हलप होवू लागलं तेव्हा हिने फार्महाऊसवर तमाशा केला.. आणि आता तुला पट्टी
पढवून इथे आणलय हे नाटक करायला.. का तर मी आणि आभा एकत्र येवू नये म्हणून.. का..
का करतेय ती हे सगळ?”
“असं
नाहीये आकाश..” सोहम म्हणला पण आकाश त्याचं काहीच ऐकायला तयार नव्हता.. तो थेट
अदिती समोरचं जावून उभा राहिला.. “बस झाला माझ्या भावनांशी खेळ.. का मागे लागली
आहेस माझ्या.. सोड हे सगळ.. मला सुखाने जगू दे.. प्लीज..” आकाशने अदितीच्या समोर
हात जोडले.. अदितीचे डोळे भरून आले.. आकाश आपल्या सोबत असं काही करेल हे तिला कधीच
खरं वाटलं नसतं.. पण नियतीने आज हि वेळ तिला दाखवली होती..
“आकाश..
तू ओव्हररीअॅक्ट करतोयस.. माझं ऐकून तरी..”
“बस..
खूप ऐकलं.. आता जे ऐकायला मी इथे आलोय ते ऐकायचंय मला.. आभा..” तो तिथूनच आभाच्या
दिशेने वळला.. “मला आत्ता तुझं उत्तर जाणून घ्यायचंय.. तेही यांच्या समोर..”
अदितीला
आता हे सहन होत नव्हतं.. ती तिथून जाण्यासाठी वळली तोच आभाने तिला हाक मारली.. “थांब
अदिती.. उत्तर ऐकूनच जा..”
सोहमने
अदितीचा हात धरला.. तिला थांबवलं.. हे सारं अखेर कुठे जावून थांबतय हे त्यालाही
पहायचं होतं.. आणि अजूनहि त्याने हार मानली नव्हती.. तो त्यावेळी अदितीच्या
नकाराने दुखावला होता.. पण हे सारं अदितीने का केलं असेल याची त्याला हळूहळू संगती
लागू लागली.. प्रेमाचा पडदा डोळ्यावरून दूर झाला आणि सारं सूर्य प्रकाशासारखं लख्ख
झालं.. फक्त काही दुवे राहिले होते.. तेच जाणून घ्यायला आज तो इथे आला होता..
अदिती सरळ सरळ सांगणार नाही म्हणून तिला जरा घाबरवूनच त्याने सारी कथा तिच्याकडून
वदवून घेतली होती.. आणि आता तो तिच्यासाठी, तिच्यासोबत इथे उभा होता..
आकाश
त्या दोघांना सोडून आभाकडे गेला.. तिच्यासमोर उभा राहिला..
“सांग
आभा.. काय आहे तुझं उत्तर..” आभाने एकदा अदितीकडे पाहिलं.. तिने मान खाली घातली
होती.. सोहम तिचा हात घट्ट धरून तिच्या शेजारी उभा होता.. आभाने पुन्हा आकाशच्या
डोळ्यात पाहिलं.. ती छानसं हसली आणि म्हणाली..
“I Love You Too आकाश.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे..”
क्रमशः
Comments
Post a Comment