ओलांडून जाताना... भाग - 3

आभाच्या आश्चर्याला सिमा नव्हती.. ज्याला विसरून जाण्याचा प्रयत्न करायचं मनाने ठरवलं त्यालाच असं दारात उभं असलेलं पाहून तिला काय बोलावं ते कळेना.. आकाशच्या चेहर्यावरचं हसुही हळुहळु  मावळलं.. तो काहीसा अवघडल्यागत झाला.. दोन सेकंदभरच लोटली असतील बहुतेक.. पण आभाला युगं लोटल्यासारखं वाटत होतं..
"मी आत येवू?" आकाश म्हणाला..
आभा दारातून बाजूला झाली.. आकाश आत आला.. मात्र आज तो नेहमीचा आकाश वाटत नव्हता.. त्याचा हालचालींमधे एक परकेपणा होता.. या घराचा कोपरन कोपरा त्याला पाठ होता पण आज मात्र एक अनोळखीपण भरुन राहिलं होतं.. तो येउन सोफ्यावर बसला.. आभाला वाटलं धावत जावं आणि नेहमी सारखं त्याच्या शेजारी बसावं.. त्याच्या खांद्यावर हात टाकावा.. टाळ्या देत कुठल्याशा निरर्थक विषयावर त्याच्यासोबत गप्पा माराव्यात.. पण ती त्याच्या समोरच्या खुर्चीवर तितक्याच अलिप्तपणे बसली..
एक डेड पॉज.. काय बोलावं? कुणी बोलावं? कसं बोलावं? हे प्रश्न त्या दोघांना इतक्या वर्षात पहिल्यांदाच पडले असावेत.. दोघंही एकमेकांकडे पाहत राहिले फक्त..
'आता का आलायस? जेव्हा तुला विसरायचं ठरवलय मी.. आपण मित्र बित्र बनुन राहुया असं काही बोलणार असशील तर जा.. मला नाही इंटरेस्ट.. मित्र खूप आहेत माझे.. तू मित्र म्हणुन नकोयस मला..'
आभाला हे सारं बोलायचं होतं.. पण ती म्हणाली..
"हे!! इथे कसं काय?"
"बोलायचं होतं.. बोलूया?"
" बोल.."
"अ!! त्या आधी कॉफ़ी करतेस.. तुझ्या हातची आवडते मला.. खूप.."

'उगाच स्वीट बनायचा प्रयत्न करू नकोस.. जे काय बोलायचं आहे ते बोल आणि विषय संपव..'
असं आभाला कितीही म्हणायचं असलं तरीही का कोण जाणे पण पुढच्या दहा मिनिटात ती कॉफ़ीचे दोन गरमा गरम mug घेउन हॉल मधे येत होती.. तिला स्वतःचा अतिशय राग येत होता.. कितीही नाही म्हंटलं तरी ती का पाघळत होती??
"बोल आता" काहीसा तुटकपणे बोलायचा प्रयत्न करणारी ती..
त्याने शांतपणे कॉफ़ीचा एक घोट घेतला..
"वा! वर्ष झालं तुझी ही कॉफ़ी पिउन"
'याचं डोकं  ठिकाणावर आहे का? दोन दिवसांपूर्वी तर प्यायलाय!!' तिच्या मनातलं हे वाक्य त्याने बरोबर ओळखलं..
"३१ डिसेम्बर झाला ना परवा.. नविन वर्षातली ही पहिली.."
आपला जोक एक्सप्लेन करुन तो छानसं हसला..
'मी ती रात्र कशी विसरेन.. त्या रात्री तर माती खाल्ली मी..' मनात हा विचार करून आभा उघडपणे "हं!! " इतकच म्हणाली..
आकाशच्या चेहर्यावरचं हसू मावळलं.. तिच्या मनातली सल त्याला कळत नव्हती असं नाही.. तो फक्त तो विषय टाळत होता.. जेव्हा की तो त्याच विषयावर बोलायला आला होता..
"आभा तू अजुन सिरिअस आहेस.. मला वाटलं आत्ता पर्यन्त तू.."
'नाचत बागडत असेन.. आनंद साजरा करत असेन.. असं वाटलं होतं का तुला? मला तुझ्या डोळ्यात जे प्रेम दिसत होतं ते खरच इतकं  फेक होतं का?' आभा मनात
"I am sorry आभा.. I was wrong.. "
'एक मिनिट याला पश्चाताप म्हणावा का?' आभाच्या मानत त्याच्या एका वाक्याने हजारो आशेचे किरण जागे केले होते..
"मी तुला ते पत्र लिहिणं ही माझी खूप मोठी चुक होती.."
'हे संभाषण मला वाटतय तसच पुढे चाललय.. आणि मला ते आवडतय..' आभा वरुन शांत दिसत असली तरी तिच्या मनात खुप उलथा पालथ सुरु होती.. आकाश आता पुढे काय बोलणार हे ती कानात प्राण ओतून ऐकायला आतुर होती..
"आभा मी खरं तर तुला स्वत: येवून भेटायला हवं होतं.. म्हणजे हा सगळा गोंधळ झाला नसता.."
'अजुनही वेळ गेलेली नाहिए आकाश.. सगळा गोंधळ दूर होइल.. एकदा मी माझ्या मनातलं सांगायची हिम्मत केली.. आता तू कर..' आभा तिच्याही नकळत स्वत:च्या गुढघ्यावर कोपरं ठेउन पुढे येवून बसली होती.. तिच्या एकंदर body language मधून तिची आतुरता दिसत होती..
"आभा मला खात्री आहे की तू मला समजुन घेशील.. आणि मी जे बोलणार आहे त्यावर विचार करून उत्तर देशील"
आकाश थांबुन तिच्याकडे पाहू लागला.. तिच्या चेहर्यावर आता टेंशन दिसत नव्हतं.. तिने खुणेनेच त्याला बोलायला सांगितलं..
"आभा मला तू ते पत्र दिलस आणि गेलीस..  मला खरच ते पत्र वाचुन विश्वासच बसला नाही की तुला माझ्या बद्दल असं काही वाटतय.. मी खरच असा विचारच केला नव्हता.. नाही म्हणजे आपण खूप ख़ास मित्र आहोत याची खात्री होती मला पण हे असं काही"
'हा परत परत तेच का बोलतोय.. ' हा ताणला गेलेला सस्पेंस आता आभाच्या डोक्यात जात होता..
"आभा.. आपण चांगले मित्र आहोत.. खूप चांगले.. आणि म्हणुनच.."
'आणि म्हणुनच आपण परफेक्ट कपल होउ शकतो हेच म्हणायचय ना तुला?' आभाने मनात मांडलेल संभाषण आतापर्यंत तरी बरोबर जात होतं..
"आणि म्हणुनच आभा तू हे समजू शकतेस की.. मी खरच कधीच तुला त्या नजरेने पाहू शकत नाही.."
हे मात्र आभाच्या ठरवलेल्या संभाषणाचा भाग नव्हता.. तिला हां आश्चर्याचा धक्का होता.. इतका वेळ मनातल्या मनात सुरु असलेलं तिचं हे संभाषण भंग पावलं आणि ती मोठ्याने ओरडलीच..
"WTF आकाश.. तू काय माझी मस्करी करायचं ठरवलं आहेस का? I really Love you.. तुझ्या पत्रामुळे माझी जी वाट लागलीय त्यातून overcome करायचा मी प्रयत्न करतेय आणि तू इथे येवून घुमावुन फिरवून माझ्या तोंडावर तीच गोष्ट सांगतोयस.. तुला कळतय का what u r doing??"
"मला कळतय आभा.. i know मी खूप चुकीचं वागतोय पण.. पण i have no choice.."
"म्हणजे?? माझ्यासोबत इतकं  वाईट वागायचं अशी जबरदस्ती आहे का तुझ्यावर?"
आभाचा पारा चढला होता.. आधी अशा अनपेक्षित brekup चं दुःख.. त्यात आकशने असं येवून तिच्या मनात जगावालेली आशा.. आणि अखेर पुन्हा त्रात लिहिलं होतं तेच बोलून त्यावर ओतलेलं पाणी.. तिचा राग स्वाभाविकच होता..
"मला कळतोय तुझा प्रॉब्लम आभा.. पण.."
"Get lost आकाश.. i don't want to talk with you"
"आभा please"
आभा आता उठून त्याला घराबाहेर ढकलू लागली.. तरी आकाश तिने त्याचं बोलणं ऐकावं म्हणुन तिला कन्विंस करत होता..
"जा आकाश मला काहीच ऐकायचं नाहिये.."
"आभा प्लीज.. मी अदितिला सांगुन बसलोय की तू माझी Girlfriend आहेस.."
आभाचा तिच्या कानांवर विश्वासच बसला नाही.. कोण अदिती? तीचा तिच्या आणि आकाशच्या आयुष्याशी काय संबंध.. आभाला नकार देणार्या आकशने या अदितिला असं का सांगितलं असेल?? आभाच्या मनात अनेक प्रश्न क्षणात उभे राहिले.. पण ओठातून एकच शब्द बाहेर पडला..
"म्हणजे??"

क्रमश:

Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४