ओलांडून जाताना... भाग-२२
दूर जाती जागलेल्या भावनांचे ते कवडसे, मन आता माझे रिते का हे असे रे होत आहे.. वेळ गेली टाळुनी तो काळही खोटा निघाला, का भरवसा मीच माझा हरवूनी बसलेच आहे.. त्यांच्या एकांकीकेतल्या या ओळी आभाच्या मनात लूप लागावा तशा वाजत होत्या.. अदितीने फार्महाऊसवर सार्यांसमोर तमाशा करून हे सांगितलं होतं कि आभा आणि आकाश कपल असल्याचं नाटक करतायत.. हे सत्य आभानेच अदितीला सांगितलं होतं.. आणि आपण जे बोललोय ते कधीतरी बाहेर येणार याची आभाला आधीपासून कल्पना होती.. पण हे सारं असं होईल याचा तिने कधीही विचार केला नव्हता.. सगळ्यांसमोर.. इतक्या अनपेक्षितपणे.. आणि ते घडल्यावर तिला इतकं विचित्र वाटू लागेल याचा तर तिने विचारच केला नव्हता.. तिची कॉलेजला जायची इच्छा होत नव्हती.. पिकनिकमुळे थकली असेल म्हणून आईनेही तिला घरी थांबू दिलं.. ती फक्त घरात बसून त्या साऱ्या घटनांचा विचार करत होती.. मध्येच तिला एकांकीकेतल्या काही ओळी आठवत होत्या.. ती खूप डिस्टर्ब होती.. आपल्याला बरं वाटावं म्हणून तिने विधीशालाही फोन केला होता.. तिला सगळं सांगितल्यावर तिने खास काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती.. “बेबी.. आय टोल्ड...