ओलांडून जाताना... भाग-३१
थियेटरच्या
बाहेरच्या पु.लं.चा पुतळा रात्रीच्या अंधारात बुडाला होता.. आत एकांकिका स्पर्धा
सुरुचं होती.. पण बाहेर त्या पुतळ्या समोरच्या मोकळ्या जागेत एक वेगळंच नाट्य
रंगलं होतं.. आभा, आकाश आदिती आणि सोहम तिथे उभे होते.. आकाशने नुकतच आभाला प्रपोज
केलं होतं.. पण तिचं उत्तर कळायच्या आतच सोहम अदितीला तिथे घेवून आला होता..
अदितीचं
आकाशवर खरंच प्रेम आहे आणि त्याने तिचं म्हणणं एकदा तरी ऐकावं असं सोहमच म्हणण
होतं.. पण आकाशला अदितीच्या आतापर्यंतच्या सगळ्या नाटकांसारखं हेही एक नाटकच वाटत
होतं.. आकाश सोहम आणि अदितीला सोडून आभाकडे गेला.. तिच्यासमोर उभा राहिला..
“सांग
आभा.. काय आहे तुझं उत्तर..” आभाने एकदा अदितीकडे पाहिलं.. तिने मान खाली घातली
होती.. सोहम तिचा हात घट्ट धरून तिच्या शेजारी उभा होता.. आभाने पुन्हा आकाशच्या
डोळ्यात पाहिलं.. ती छानसं हसली आणि म्हणाली..
“I Love You Too आकाश.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे..” अदिती हे
उत्तर ऐकून जाण्याचा प्रयत्न करू लागली.. पण सोहमने तिला अडवल..
“आभा..
प्लीज.. अदितीचं म्हणण एकदा..”
“सोहम..
बस झालं.. त्यांच्या मध्ये नाही यायचंय मला.. लेट्स गो..” अखेर न रहावून अदिती
म्हणाली.. आणि सोहमला ओढत ती तिथून नेवू लागली..
“आकाश..
माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे रे.. पण माझ्या मॉममुळे मी ते तुला कधीच सांगू
शकणार नाहीये.. तिला माझ्यासाठी रिच जोडीदार हवाय.. माझ्या मावशीने केला तसा
मुर्खपणा मी केलेला तिला नकोय..” जाता जाता अदितीच्या कानावर हे शब्द पडले आणि ती
तिथेच थबकली.. आभाचे बोलत होती ते तिचे डायरीतले बोल होते..
“आकाश..
तुला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मला आवडला होतास तू.. तुझी नजर.. तिने भारून
टाकलेलं मला.. तुझं डान्स.. प्रत्येक ऑडीशन मध्ये तुझं माझ्यासाठी परफॉर्म करणं..
आपला ती पहिला डान्स अजून आठवतोय.. तुला आठवत असेल का रे ते गाणं?”
“आभा?”
आभा काय बोलतेय ते काहीच न कळून आकाश म्हणाला..
“पण
मी अनेकदा नाचले त्या गाण्यावर... एकटीच.. तू सोबत आहेस असा विचार करून.. मलाही
वेडं व्हायचय रे तुझ्या प्रेमात पण भीती वाटते.. माझी मावशी चुकली.. प्रेमात
पडली.. लग्न केलं आणि आता त्याचं नवऱ्याला दोष देत जगतेय.. मला आपल्या बाबतीत तसं
घडायला नकोय.. कधीही.. आपल्या दोघांची आयुष्य खूप वेगळी आहेत रे.. ती करेक्टली एक
नाही होवू शकली तर? मला आयुष्यभर तुला दोष देत जगायचं नाहीये..”
“हे..
हे काय आहे आभा?” आकाशला जराजरा अंदाज येवू लागला होता.. अदिती शॉकड होवून हे पाहत
होती.. तिच्या डोळ्यातून आसवं येतच होती..
“आकाश..
मला सगळी बंधन तोडून प्रेम करायचय तुझ्यावर.. पण.. पण भीती वाटते.. कदाचित धमक
नाहीये ती माझ्यात.. मला तुझ्यापासून स्वत:ला अपार्ट करावं लागणार.. पण कसं करू..
हा.. माझ्यावर जो प्रेम करतो त्याला होकार देते मी.. तुझ्यापासून दूर जाण्यासाठी
कदाचित तिचं गोष्ट मला मदत करू शकेल.. मला वाटतं मला सोहमला होकार द्यावाच लागणार
आहे..”
इतका
वेळ हे सारं असंबंध बडबडणाऱ्या आभाने अखेर वळून आकाशच्या डोळ्यात पाहिलं..
“हे
काय बोलतेयस आभा?” आकाश अविश्वासाने आभाकडे पाहत म्हणाला..
“जे
तुला खूप आधीच कळायला पाहिजे होतं आकाश.. या अदितीच्या डायरीतल्या काही ओळी आहेत..
गेल्या वर्षभरात तिच्यासोबत जे काही झालं त्याचा सार..”
“काय..
पण तुला?” आकाशने आश्चर्याने विचारलं.. त्याचं आभाला हसूच आलं...
“हे
सगळ मला आधीपासून कळत होतं आकाश.. दिसत होतं.. पण समजत नव्हतं.. जीक्सो पझल
सारखं.. जोपर्यत सगळे तुकडे जुळून येत नाहीत.. चित्र पूर्णच होत नाही ना.. आज ते
पूर्ण झालं..” आभाने तिच्या बॅगमधून अदितीची डायरी बाहेर काढली.. ती अदितीकडे गेली
आणि तिच्या हातात डायरी देत म्हणाली.. “हि तुझी आहे.. माफ कर मी वाचली.. पण नसती
वाचली तर बर्याच प्रश्नांची उत्तरच मिळू शकली नसती गं..”
आभाने
आकाशकडे पाहिलं.. त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले होते.. एका वेगळ्याच वळणावर
नियतीने त्याला आणून ठेवलं होतं.. पण म्हणजे अदिती जे फार्महाउसवरचा गोंधळ
झाल्यावर त्याला बोलली होती ते खोटं होतं.. कि आभाच्या हातात असलेली हि डायरीच
खोटी होती.. आकाशला काहीच समजेनास झालं होतं.. आभा त्याच्याकडे आली..
“कसला
विचार करतोयस इतका.. तुझ्यावर खरच प्रेम करते ती मुलगी.. तुही तिच्यावर करतोस.. मग
आता कसला विचार..” आभाच्या अशा वागण्याने त्याला जास्तच गिल्टी वाटू लागलं..
“पण
आभा.. मी तुझ्यावर प्रेम करतो.. खरंच..”
“मी
कुठे नाही म्हणतेय.. पण माझ्यावर तुला प्रेम करायला मी भाग पडलंय..”
“नाही..
असं नाहीये..”
“माझ्या
खूप हुशार बहिणीच्या प्लान बरहुकूम मी तुला माझ्या प्रेमात पडलंय आकाश.. मी
तुझ्याशी जे वागत होते.. जे काही बोलत होते.. ते सारं आधीच माझ्या बहिणीने ठरवलं
होतं..”
“काय?”
आकाशला यावर विश्वास बसत नव्हता.. “कोण तुझी बहीण?”
“तिच
जी तुला हिप्नोटाईझ करायला आली होती.. तिच्या प्लानचा तो शेवटचा टप्पा होता.. जो
यशस्वी झाला नाही..”
“काय?
प्लान.. म्हणजे?”
“ती
खूप लांब लचक गोष्ट आहे पुन्हा कधीतरी सांगेन.. पण आत्ता हे महत्वाचं आहे कि तुझं
प्रेम तुला परत मिळतय..”
“पण
आभा.. मी आता अदितीवर नाही..”
“माझी
बहिण मला एकदा म्हणाली होती आकाश.. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये माणसं आपला पासवर्ड अशा
एका व्यक्तीच्या नावाने ठेवतात जिच्यावर त्याचं खूप प्रेम होतं.. पण लग्न होवू
शकलं नाही.. अदितीला नुसता तुझा पासवर्ड बनवून ठेवू नकोस आकाश..”
आकाशला
काहीच कळत नव्हतं.. अदिती खरंच त्याचं पहिलं प्रेम होती.. आणि आभाने आता जे काही सांगितलं
होतं त्यानंतर तो अगदीच कन्फ्युज झाला होता..
“मला
काहीच कळत नाहीये आभा.. आता पुलाखालून इतकं पाणी गेल्यावर मला पुन्हा अदितीसोबत
तसं वागणं जमेल?”
“का
नाही जमणार आकाश.. प्रेम करतोस न तिच्यावर..”
“प्रेम
तुझ्यावरही करू लागलो आहे मी.. खरोखर.. मग तो प्लान असो किंवा काहीही.. प्रेम तर
आहेच ना ते.. त्याचं काय.. तुझ्यासोबत आता आधीसारख वागताना किती ऑकवर्ड वाटेल
मला..”
“अरे
म्हणून काय मनाविरुद्ध जगणार आहेस का? आणि तसंही मी आधीच तुझ्याकडून वचन घेतलं होतं..
माझ्या प्रेमात पडू नकोस.. आणि मी तुला वचन दिलं होतं कि मी अदितीला तुझ्या
आयुष्यात परत आणेन.. मी वचन पाळलंय आकाश.. आता तुही पाळ..”
आकाशला
आभाच बोलणं पटत होतं.. पण.. पण आभावर तो फार मोठा अन्याय तर ठरणार नाही ना याची
त्याला भीती वाटत होती..
“पण
आता सगळं इतकं बदलून गेलंय.. मला हे जमेल?”
“का
नाही जमणार.. आणि तसं असेल तर आपण पुन्हा सारं पहिल्यासारख करू.. आपण प्रयत्न
केल्याशिवाय काहीच होणार नाही आकाश..”
“पण?”
“विचार
करत बसलो तर सगळं आयुष्यही कमी पडेल.. त्यामुळे काहीकाही निर्णय विचार न करता
घ्यायचे असतात.. आयुष्य सुकर होवून जातं त्यामुळे.. मी माझ्या मनाचं ऐकलं.. माझा
निर्णय झालाय.. आता तुम्हीही तुमच्या मनाचं ऐका..”
आभाने
अदितीचा हात धरला आणि तिला आकाश समोर आणून उभं केलं.. दोघांची एकमेकांकडे ऑकवर्ड
नजरानजर झाली.. त्यांनी आभाकडे पाहिलं.. पण ती एव्हाना थियेटरच्या गेटकडे निघाली
होती.. त्याचवेळी एकांकिका संपली आणि लोकांचा जथ्था आतून बाहेर पडला.. आभा
त्यांच्या गर्दीत कुठे मिसळून गेली ते आकाश आणि अदितीला कळलंच नाही..
सगळ्या
एकांकिका संपल्या.. स्पर्धा संपली.. निकालही लागला.. पण त्या रात्री फक्त
स्पर्धेचाच निकाल लागला नव्हता तर अजून एक महत्वाचा निर्णय सगळ्यांच्या नकळत याचं
थियेटरच्या बाहेर लागला होता.. आभा पु.लं.च्या पुतळ्याखालच्या पायर्यांवर एकटीच
बसली होती.. स्पर्धा संपवून प्रेक्षक लगबगीने घराकडे निघाले होते.. अजून नीटस
उजाडलंहि नव्हतं.. पण आबाच्या मनात लख्ख प्रकाश पडला होता.. इतक्यात विधिशा
आभाच्या शेजारी येवून बसली.. तिच्या हातात बटाटा वड्यांचं पाकीट होतं..
“घेणार..
शेवटचे आहेत..” आभाला विधीशाच्या खान कौशल्याच आश्चर्य वाटलं.. ती हसून मानेनेच
नाही म्हणाली..
“सॉरी
यार.. पण माझा प्लान काही सक्सेसफुल होवू शकला नाही..” विधिशा वडा खात खात
म्हणाली..
“अच्छा..
पण माझ्यामते तुझा प्लान तर झाला सक्सेसफुल..” आभाच्या आवाजातला टॉन्ट लपत
नव्हता.. विधीशाच्या हातातला वडा तसाच राहिला आणि तिने आभाकडे पाहिलं..
“म्हणजे?”
“विधी..
तुझ्यासोबत राहून इतकं तरी शिकले आहेच गं मी.. अदितीची डायरी माझ्या बॅगमध्ये
टाकल्याबद्दल खरच थँक्स..” विधी आभाच्या या वाक्याने गडबडलीच..
“ए..
कुठली डायरी.. मी नाही टाकली कुठली डायरी..”
“विधी..
आता पकवू नकोस यार.. मला कळलंय.. मी तुझ्या लॅपटॉपवर काम करत असताना टाकलीस तू..
मला माहितीये..” विधिशाचा चेहरा बघण्यासारखा झाला.. आपण केलेली आईडिया आधी पकडली
जाईल हे तिला कधीच वाटलं नव्हत.. आभाला तिचा तो चेहरा पाहून गम्मत वाटली..
“आय
होप ती मिळवण्यासाठी तू तिला हिप्नोटाईझ वगैरे केलं नसशील..”
“नाही..
तिच्या खांद्यावरची बॅग फाटली यु नो.. तिच्या पडलेल्या वस्तू उचलायला मी मदत
करायला गेले आणि ती डायरी माझ्या हाताला लागली.. पण आय अॅम रिअली सॉरी आभा.. मला
फक्त तू तुझ्या मनाने फेअर डिसिजन घ्यावा एवढच वाटत होतं.. एक इंडिपेंडन्ट म्हणून
तू विचार करावास.. आकाशच्या सावलीतून बाहेर पडावस.. खरं तर म्हणूनच तो सगळा प्लान होता..
मला तुला दुखवायचं नव्हत.. तुला राग आला असेल तर..”
“ए..
वेडी आहेस का तू विधी.. उलट तू जे केलस ते खरंच माझ्यासाठी खूप चांगलं केलस.. बघ
ना या महिन्याभरात कायकाय घडलय माझ्यासोबत.. आधी आकाशचा नकार.. मग त्याची
गर्लफ्रेंड बनण्याचं नाटक.. त्यामुळे कल्चरल डिपार्टमेंटशी आलेला संबंध.. त्यामुळे
मिळालेली हि एकांकिका.. प्रतिक.. हे सारं ओलांडून जाताना आज मला जाणवतय.. या
सगळ्या प्रकरणाने मला एक नवं आयुष्य मिळवून दिलय.. मी काहीतरी करू शकते.. माझी मी
म्हणून कुणाच्याही सावली शिवाय जगू शकते हे कळलंय मला.. फ्युचर नसलेल्या कुठल्याही
रिलेशनशिपपेक्षा.. काहीतरी असलेलं कुठलंही फ्युचर चांगलंच... नाही का विधी..”
विधिशा तिच्याकडे पाहून हसली आणि तिने आभाला मिठी मारली.. आणि तिला उठवत स्वत:हि
उभी राहिली..
“चल..
मी घरी सोडते तुला..” तिला आता खूप फ्रेश वाटत होतं..
“नको..
मी जाईन..”
“ए
पागल.. आकाश अदितीला सोडायला गेलंय.. पहाटेचे पाच वाजता मी काय तुला एकटीला जावू
देणार आहे?”
“एकटी
का जाईन मी..” आभाने हसून गेटजवळ पाहिलं.. प्रतीकची गाडी तिथे उभी होती.. तो बाहेर
कॉलेजच्या काही मुलांसोबत बोलत होता.. त्याला पाहून विधीशाचे डोळेच मोठे झाले..
“वा
आभा.. फस्ट आहेस तू..”
“शट
अप विधी.. आमच्या एकांकिकेला सेकंड बेस्ट एकांकिका आणि प्रेक्षक परीक्षक अवॉर्ड
मिळालंय.. सेलिब्रेट करणार आहोत आम्ही.. बनमस्का पाव खावून..”
“सेलिब्रेट..
पण दोघच..”
“डिरेक्शन
टीमची पार्टी आहे.. त्यात आम्ही दोघंच आहोत तर काय करणार..”
आभा
खट्याळ हसली आणि गेटकडे जायला निघाली.. विधीशा अभिमानाने पाठमोर्या आभाकडे पाहत
होती.. तिथे पूर्वेला पहात होत होती.. तांबड फुटलं होतं.. आता सूर्य उगवणारच
होता..
समाप्त
Comments
Post a Comment