ओलांडून जाताना... भाग-३१

थियेटरच्या बाहेरच्या पु.लं.चा पुतळा रात्रीच्या अंधारात बुडाला होता.. आत एकांकिका स्पर्धा सुरुचं होती.. पण बाहेर त्या पुतळ्या समोरच्या मोकळ्या जागेत एक वेगळंच नाट्य रंगलं होतं.. आभा, आकाश आदिती आणि सोहम तिथे उभे होते.. आकाशने नुकतच आभाला प्रपोज केलं होतं.. पण तिचं उत्तर कळायच्या आतच सोहम अदितीला तिथे घेवून आला होता.. अदितीचं आकाशवर खरंच प्रेम आहे आणि त्याने तिचं म्हणणं एकदा तरी ऐकावं असं सोहमच म्हणण होतं.. पण आकाशला अदितीच्या आतापर्यंतच्या सगळ्या नाटकांसारखं हेही एक नाटकच वाटत होतं.. आकाश सोहम आणि अदितीला सोडून आभाकडे गेला.. तिच्यासमोर उभा राहिला.. “सांग आभा.. काय आहे तुझं उत्तर..” आभाने एकदा अदितीकडे पाहिलं.. तिने मान खाली घातली होती.. सोहम तिचा हात घट्ट धरून तिच्या शेजारी उभा होता.. आभाने पुन्हा आकाशच्या डोळ्यात पाहिलं.. ती छानसं हसली आणि म्हणाली.. “ I Love You Too आकाश.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे..” अदिती हे उत्तर ऐकून जाण्याचा प्रयत्न करू लागली.. पण सोहमने तिला अडवल.. “आभा.. प्लीज.. अदितीचं म्हणण एकदा..” “सोहम.. बस झालं.. त्यांच्या मध्ये नाही यायचंय मला.. लेट्स...