Posts

ओलांडून जाताना... भाग-३१

Image
थियेटरच्या बाहेरच्या पु.लं.चा पुतळा रात्रीच्या अंधारात बुडाला होता.. आत एकांकिका स्पर्धा सुरुचं होती.. पण बाहेर त्या पुतळ्या समोरच्या मोकळ्या जागेत एक वेगळंच नाट्य रंगलं होतं.. आभा, आकाश आदिती आणि सोहम तिथे उभे होते.. आकाशने नुकतच आभाला प्रपोज केलं होतं.. पण तिचं उत्तर कळायच्या आतच सोहम अदितीला तिथे घेवून आला होता.. अदितीचं आकाशवर खरंच प्रेम आहे आणि त्याने तिचं म्हणणं एकदा तरी ऐकावं असं सोहमच म्हणण होतं.. पण आकाशला अदितीच्या आतापर्यंतच्या सगळ्या नाटकांसारखं हेही एक नाटकच वाटत होतं.. आकाश सोहम आणि अदितीला सोडून आभाकडे गेला.. तिच्यासमोर उभा राहिला.. “सांग आभा.. काय आहे तुझं उत्तर..” आभाने एकदा अदितीकडे पाहिलं.. तिने मान खाली घातली होती.. सोहम तिचा हात घट्ट धरून तिच्या शेजारी उभा होता.. आभाने पुन्हा आकाशच्या डोळ्यात पाहिलं.. ती छानसं हसली आणि म्हणाली.. “ I Love You Too   आकाश.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे..” अदिती हे उत्तर ऐकून जाण्याचा प्रयत्न करू लागली.. पण सोहमने तिला अडवल.. “आभा.. प्लीज.. अदितीचं म्हणण एकदा..” “सोहम.. बस झालं.. त्यांच्या मध्ये नाही यायचंय मला.. लेट्स गो.

ओलांडून जाताना... भाग-३०

Image
“सांगितलं ना.. नाही लागणार फोन इथे.. आणि हो.. गाडीचं म्हणशील तर मीच ती घरी पाठवली आहे.. म्हंटल मीच सोडेन तुला घरी..” सोहमने अदितीला थेटरच्या पार्किंगमध्ये गाठलं होतं.. आज तो मनाशी बरंच काही ठरवून आला होता.. त्याने तिची गाडी घरी पाठवून दिली होती आणि तिला सुनसान अशा पार्किंगमध्ये अचानक भेट दिली होती.. त्याचा आजचा एकंदर आविर्भाव नेह्मीसारखा नव्हता.. त्याच्याबाबतीत काहीतरी विचित्र आदितीला जाणवत होतं.. त्यामुळे अदिती जास्तच अस्वस्थ झाली.. तिने इथून बाहेर पडण्याचा मार्ग कुठे आहे ते पाहिलं.. तो नेमका सोहमच्या मागे होता.. अदितीला काय करावं सुचत नव्हतं.. सोहमचा चेहरा आता चांगलाच कठोर झाला होता.. “खूप खेळ खेळलीस तू माझ्या बरोबर.. पण आता..” तो शांतपणे तिच्या दिशेने चालत येवू लागला.. अदिती समोर आता कुठलाच मार्ग नव्हता..   काय करावं तिला काहीच सुचत नव्हतं.. सोहम तिच्या दिशेने येत बोलू लागला.. “पण आता मला उत्तरं हवी आहेत.. मी तुला अनेकदा प्रपोझ केलं होतं अदिती.. दरवेळी तू मला नकार दिलास.. पण तरीही मी खूष होतो.. तुझं प्रेम मी कधीतरी मिळवेन हि आशा होती त्यात.. ती नकार खरचं बरा होता अदिती